Friday, June 29, 2018

शांत झाला कवी।

कविता आज सुचेनाशी झाली
शब्द ते प्रेमाचे विसरुनी गेले।
काहोर मजवायचे मनी कधीकाळी
शब्द आज सारे गुपचुप झाले।
बडबडणारे ते कवी मन
आज कसे शांत झाले...?
प्रेमाच्या या दुनियेत गप्प
झाला आज हा कवी।
तर... कसा अमर राहिल
तो तिचा प्रेम कवी।
                ✍कवी प्रेम✍
                 २९/०६/०१८
                 ९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, June 24, 2018

मी प्रेम केलं......!

*मी प्रेम केलं......!*
तिच्या त्या गोड स्वभावावर।
तिच्या त्या सुंदर दिसण्यावर
तिच्या लाजणाऱ्या चेहऱ्यावर
*मी प्रेम केलं......!*
रागाने लालबुंद झालेले नाकावर
गुलाबी तिच्या ओठावर
*मी प्रेम केलं.......!*
हुशार नव्हे तर बावळंट
त्या तिच्या शब्दावर
बोलताना हलचाल होणाऱ्या
तिच्या त्या गोड ओठावर
*मी प्रेम केलं........!*
नजरेला नजर नं भिडता
केलेल्या प्रेमळ अशा प्रेमावर
ओठाने कमी पण नजरेने
बोलणाऱ्या तिच्या डोंळ्यावर
*मी प्रेम केलं.........!*
दुसऱ्याच्या सुखासाठी नेहमीच
विरजन आपल्या सुखावर
*मी प्रेम केलं.......!*
तिने दिलेल्या प्रत्येक
सुखदायी क्षणावर
तिने दिलेल्या प्रत्येक
घावरुपी शब्दावर
*मी प्रेम केलं......!*
मला तु विसरून जा या
तिच्या दबक्या आवाजावर
रडताना निघतं असलेल्या
तिच्या त्या हुंदक्यावर
*मी प्रेम केलं......!*
         ✍ *कवी प्रेम*✍
               २४/०६/०१८
               ९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, June 22, 2018

तिच्या नजरेत जादु होती


ज्वालामुखीचा उद्रेक जनु
ते तिचे तिक्ष्ण डोळे।
भावलो मी तिच्या नजरेला
मन माझे जरासे भोळे।
एक अनोखी नजराना तिचा
नजरेत तिच्या जादु होती।
मी नव्हे कधीच तिचा
माझ्यासाठी फक्त ती होती।
उर्वसी ना मेनका भारी
माझ्यासाठी तीच रंभा लयभारी।
कवी प्रेम
२२/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

तिला आवडलं तसा बदलतं गेलो।

तिच्या त्या प्रेमाच्या आठवणीत
आज ही रमुन जावंस वाटतं।
तिचं तेवढं खरं बोलणं
बाकी सार खोटं वाटतं।
तिला आवडलं तसा बदलतं
गेलो फक्त मी तिच्यासाठी।
प्रत्येक कविता तिलाच साद
घालते करमणूक या जगासाठी।
प्रत्येक शब्द अतंकरणातुन
निघताना रक्त भंबाळ होतो।
तरी देखील तिच्या आठवणींना
काळजाच्या तिजोरीत ठेवतो।
कवी प्रेम।
२१/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, June 20, 2018

लेखणीचं सौभाग्य


प्रियेसी मानलं मी लेखणीला
जपतोय तिचं ते सौभाग्य।
आठवतं मला तिच्या प्रेमामुळं
हे मी संमजतो माझं भाग्य।
✍ *कवी प्रेम*✍
२०/०८/०१८
९६०४०००९६९

एकच इच्छा मनी

एकच इच्छा मनी या
प्रेम वेड्या कवीची।
पैसा-अडका लय येईल
प्रेम अन् भुक तुमच्या मैत्रीची।
माझ्यासाठी सर्वस्व प्रेम अन्
जिव की प्राण आहे तुमची मैत्री।
चला झोपा आता नको
कसला विचार शुभ रात्री।
कवी प्रेम।
१९/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, June 6, 2018

नि:स्वार्थी प्रेम तीचं


पहिल्या पाऊसाची सरीत तो
भिजुन गेला थंडगार वारा।
प्रेमच तिचं नि:स्वार्थी होतं
सांगुन गेला तो पाऊस सारा।
अशाच पाऊसात आम्ही दोंघे
एका छत्री खाली असायचो।
ओलेचिंब भिजुन दोंघे ही
एकामेंकाकडे एकटक बंघायचो।
आता फक्त आठवणीत राहिलेत
ते गेलेले आमच्या प्रेमाचे दिवस।
ती गेली अर्ध्यावर सोडुन
अपुर्ण राहिली माझ्या प्रेमाची ती हवसं।
असचं सुखी ठेवं तिला
देवाजवळ येवढाचं माझे नवस।
कवी प्रेम।
०६/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/