Sunday, April 30, 2017

जगावेगळं प्रेम करायचं।

आपण ना जगावेगळं एक
मेकांवर दोघांनी प्रेम करायचं।
या सार्या जगासमोर एक
आदर्श म्हणुन कायम राहयचं।
पण आपलं प्रेम आपण
मात्र आपल्या घरंच्याना सांगायचं।
नाही तर नको बाबा प्रेम
तसंल शेवटी त्यात मरायचं।
प्रेम।
30/04/017
9604000969

Saturday, April 29, 2017

गणित सुटतं नसतील।

का बरं शाळेतील मुले आत्महत्या
करण्याचा प्रयत्न करत असतील?
माझ्या मताने त्यानां या
जीवनाचे गणित सुटतं नसतील।
प्रेम।
29/04/017
9604000969

Friday, April 28, 2017

प्रेम संमजुन बसलो।

तिच्या त्या गोड हसण्यात
स्वतःला हरपुन बसलो।
तिच्या त्या मैत्रीला मी
माझं प्रेम संमजुन बसलो।
प्रेम।
28/04/017
9604000969

Thursday, April 27, 2017

कविता नाही माझ्यावर।

ति म्हणते आजपर्यंत एक ही
कविता नाही बघ तुझी माझ्यावर।
संगळ काही सुंचत तुला
पण सुंचत नाही माझ्यावर।
याचाचं अर्थ विसरलास मला
पहिल्या सारखं प्रेम नाही ना माझ्यावर?
प्रेम।
27/04/017
9604000969

Wednesday, April 26, 2017

तु प्रेम कवी आहे।

तु प्रेम कवी आहेस
असं मित्र मला म्हणतात।
तु प्रेमावर चांगलेच लिहु
शकतो असे ते बोलतात।
खरंच मी प्रेमावर चांगले
लिहु शकतो?का उगाच
ते मला फुगवतात?
प्रेम।
26/04/017
9604000969

Friday, April 21, 2017

विचार मथंन।

आज काल ज्याचा काही उपयोग
नाही त्याचंच करतात लोक कथनं।
नका विसरु थोर पुरुषानां आठवा
त्यांनी दिलेल्या विचार मथंन।
प्रेम।
21/04/017
9604000969

स्वार्थापोटी।

प्रत्येक नातं हे लोक
स्वर्थापोटी जपतात।
फक्त स्वर्थच संगळ्या गोष्टीत
प्रेम मात्र हे टाळतात।
प्रेम।
20/04/017
9604000969

Wednesday, April 19, 2017

आयुष्य कसं निघायचं?

ज्या व्यक्तिबरोबर सारं आयुष्य
घालवायला तयार तिला नाही बघायचं?
या कारणानेच वाद आपला मग
आयुष्य कसं गं निघायचं।
प्रेम।
19/04/017
9604000969

Tuesday, April 18, 2017

आपला मार्ग निवडावा।

खोटे आहेत मित्र सारे
नुसता तोंडा पुरता देखावा।
मला गरज नाही तुमची
तुम्ही आपला मार्ग निवडावा।
प्रेम।
18/04/017
9604000969

Monday, April 17, 2017

हसतात हे मित्र।

आजही मला अन् माझ्या
कवितेला हसतात हे मित्र।
त्यांच्या संमजण्याच्या बाहेर
आहे माझी कविता अन् हे पत्र।
मित्रांना फक्त नावं ठेवणं
तेवढं चांगलच हो जमतं।
त्यांची अक्कल तेवढी नाही
म्हणुन तर त्यांना कुठं सुंचत।
खरं तर त्याच्यां अक्कले बाहेरच
आहे लिखाण अन् हे सुत्र।
त्यांना काय कळणार मनातलं
अन् हे कसं असतं काव्यक्षेत्र।
प्रेम।
17/04/017
9604000969

Sunday, April 16, 2017

परंपरा धरुन।

नेमकं काय साध्य होतं जातीच्या
मुली किंवा मुलासोबत लग्न करुन।
प्रेमाला दिडकाऊन तिच्या सोबत
लग्न करायचं फक्त परंपरा धरुन।
प्रेम।
16/04/017
9604000969

Saturday, April 15, 2017

गणित तुझं आयुष्या।

थकुन गेलो मी जीवनाला
गणित सुटेना तुझं आयुष्या।
कधी सुटेनं मला हे गणित? का
मरण हेच उत्तर तुझं आयुष्या।
प्रेम।
15/04/017
9604000969

Thursday, April 13, 2017

माणसातला माणुस।

कुठं दिसतोय हो आता
माणसातला माणुस येथे।
साले मतलबी संगळे नुसतं
सोंग करतात कमापुरते येथे।
प्रेम।
13/04/017
9604000969

Wednesday, April 12, 2017

दारुबंदी।

या दारु बंदीमुळे कित्येकाचे
संसार सुधरले आता।
दारु म्हणजे तरुणानां लागलेली
किडं होती भरारी घेईल तो आता।
प्रेम।
12/04/017
9604000969

Tuesday, April 11, 2017

कधी येईल पावसाळा?

ताहनली ही धरती माय
कधी येईल हा पावसाळा?
जिव घेईल राव माणसांचा
एक दिवस हा उन्हाळा।
प्रेम।
11/04/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in

Monday, April 10, 2017

तिच्यावर नाज।

माझं पिल्लू माझ्यापासुन
दुर गेलं आज ।
होतंच पिल्लू तसं माझं
म्हणुन तर आहे तिच्यावर नाज।
निरोप देताना तिला डोळे
माझे भरुन आलते आज।
घटं मिठ्ठी मारली होती
तिनं जाताना मला।
खरंच रे राज्या येईल मी परत
नाही विसरु शकतं मी तुला।
ती तर बोलली मनातलं पण
आग लागून गेली काळजाला।
प्रेम।
10/04/017
9604000969

Sunday, April 9, 2017

प्रेमगंध।

आज ही तुझ्या आठवणीत
मी रोज कविता करतो।
अजुन ही तुझाच प्रेमगंध
मला भरपुर काही शिकवतो।
प्रेम।
09/04/017
9604000969

Saturday, April 8, 2017

शहाणपणा शिकवतात।

आजकाल प्रेमावर कविता
करणारे कवी कमी दिसतात!
जो लिहितो कोनी त्याला मात्र
वाचणारे शहाणपणा शिकवतात।
त्यांना फक्त कविता वाचता येते
कवितेतल्या भावना कुठे कळंतात।
प्रेम।
08/04/017
9604000969

Friday, April 7, 2017

कारण काय होतं?

डोळ्यातं तिच्या अंगार
चेहर्यावर मात्र हसु होतं।
ती मला सोडुन गेली याच
नेमकं कारण काय होतं?
प्रेम।
07/04/017
9604000969

Thursday, April 6, 2017

ती सध्या काय करते?

माझ्या रोजच्या कविता वाचून मित्र
म्हणतात ति अजुन पण फोन करते?
अन् पहिलं होतं तितकं प्रेम ति
तुझ्यावर अजुन पण करते?
नाही रे मित्रांनो ति माझ्या
बिलकुल संपर्कात नाही।
अन् माझ्यावर तीच प्रेम आहे
की नाही हे मला माहित नाही।
आज जी कविता करतो ती फक्त
तिच्या आठवणीत पुर्ण होते।
तुम्हा सर्वांची शपथ मित्रांनो मला हे
पण माहित नाही ती सध्या काय करते?
प्रेम।
06/04/017
9604000969

Wednesday, April 5, 2017

डोळ्यात येतं पाणी।

कसली हो जात आली
या लहानपणी?
दुखांचा स्पर्श देखील नाही
फक्त गातात सुखाची गाणी।
आज ही बालपण आठवले
कि डोळ्यात येतं पाणी।
प्रेम।
05/04/017
9604000969

Tuesday, April 4, 2017

काय साद्ये करतोय?

रोज रोज तिलाच अठवून
मी कविता पुर्ण करतोय।
विषय तोच प्रेमाचा अन्
फक्त त्यावरच का कविता करतोय?
मनात बरेच प्रश्न येतात माझ्या
नेमकं मी काय साध्ये करतोय?
प्रेम।
04/04/017
9604000969

Monday, April 3, 2017

राजेनां विनम्र अभिवादन।

आजच्या दिवशी आमचे राजे
पोरखं करुन गेले प्रजेला।
एक जुटीने रहा तुम्ही
हा संदेश दिला प्रजेला।
नेहमी आदर करा परस्रीचा
विसरु नका इतिहासाला।
नुसतं छत्रपति नाव जरी
ऐकलं फुलुनं जातं मन।
अशा आमच्या राजेनां
करतो विनम्र अभिवादन।
प्रेम।
03/04/017
9604000969

Sunday, April 2, 2017

दोन वर्ष पूर्ण झाली।

मी लेखणी हातात घेऊन तब्बल
आज दोन वर्ष पुर्ण झाली।
या कवितेच्या दुनियेत मला
खुप कवी कवीत्री मित्र मिळाली।
त्यांच्या अशिर्वादामुळे अन् तुम्हा
सर्वाच्या प्रेमामुळे 1063 वी
कविता आज पुर्ण झाली।
असंच प्रेम राहुद्या माझ्यावर
जसं प्रियेसीच प्रियेकरावर।
प्रेम।
02/04/017
9604000969

Saturday, April 1, 2017

खुप गोड हसायची।

खुप जिव लावायची ती मला
अन् खरं प्रेम माझ्यावर करायची।
तु टायमपास तर करत नाहीस
ना?असं सारखंच ती विचारायची।
मी तुला सोडुन नाही रे जगु
शकणार असं ती म्हणायची।
मग आज कुठं गेलं तिचं प्रेम?
का ती असं संहज बोलायची।
पण काही असुद्या मित्रांनो
पण ती खुप गोड हसायची।
प्रेम।
01/04/017
9604000969