Saturday, September 29, 2018

शेवटचा श्वास माझा


हतात ठेऊनिया फुलाची पाकळी
डोंळ्यात तुझी ती मुर्त माझ्या।
आठवणीत राहिल कायम मी
अन् प्रत्येक कविता तुझ्या।
सोडतोय शेवटचा श्वास माझा
जो तुझ्यात गुतंला होता।
काळाची मर्जी ती अन्
नशिबाचा माझ्या भोग होता।
कवी प्रेम।
२९/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, September 28, 2018

"अथांग प्रेम"


चाललीस तु सोडुन तर.......
माघ वळुन बघतेस का...?
मी होतो तसा बरा होतो
मला बदललस का...?
प्रेमात घमंडी तु अन्...
मी हताश आज आहे।
तुझ्या नजरेत टायमपास
अन् माझ्यासाठी स्वर्ग आहे।
ते म्हणजे *"अथांग प्रेम"*
कवी प्रेम।
२८/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, September 27, 2018

काय किंमत त्या प्रेमाची..?


आठवणींना कुरवाळत
त्या पेनावर जोर देतो।
ह्रदयी हुंदका दाटुनीया
भाव कागदावरी उतरतो।
मनाला मारुनी मी करमणुक
करतो या युवा पिढीची।
थिल्लरपणा यांच्या नजरेत
काय किंमत त्या प्रेमाची..?
कवी प्रेम।
२७/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, September 26, 2018

सौंदर्याच्या जोरावर


हल्ली बिलकुल भरोसा
बसतं नाही माझा प्रेमावर...!
टायमपास करतात मुली
सौंदर्याच्या त्या जोरावर।
कुठं ठाऊक त्यांना की....
सौंदर्य आज आहे उद्या नाही।
प्रेम करणारा एकदाच भेटतो
आयुष्यात पुन्हा भेटतं नाही।
मी तिच्या सौंदर्यावर नाही तर....
प्रेम तिच्या लाजाळु स्वभाव केलं।
कदाचित तिचं ही प्रेम होतं म्हणुन
तर मला कवी हे नवं नावं मिळालं।
ती विसरली असेल पण....
मी कसा विसरु त्या नकटीला..?
कविता पुर्णच होते तिच्यामुळे
अन् तिची आठवण शब्द देतात मला।
कवी प्रेम।
२६/०९/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/

नापास झालो प्रेमात...!


मी लव गुरु कसला...मित्रांनो
मी तर नापास झालो प्रेमात।
नाही जागा करु शकलो 
मी तिच्या त्या मनात।
मला काय कळतंय हो प्रेमाबद्दल
मी तर..यात अडाणी आहे।
शब्दांचा बादशाहा मी राजा
तिच्या प्रेमात भुकेला आहे।
लिहायचं शिकलो फक्त तिच्यामुळं
अन् करमणुक तुम्हा सर्वांची।
प्रत्येक कवितेतं माझं मनोगत
चेहरा समोर तिचा अन् जुळणी मात्र शब्दांची।
कवी प्रेम।
२५/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, September 22, 2018

कोण कवी म्हणलं मला....!

आज ही सतावतंय मला
आठवणीतलं ते खरं प्रेम।
जगावेगळ होतं ते अन्...नव्हतं
कदापी ते तुमच्यावानी सेम।
ना कधी वासनेनं होतं
ना कसली भुक होती।
नि:स्वार्थी मनाने आगदी मी
तिचा अन् ती माझी फक्त होती।
काळाने घाला घातला आज
अन् वेगळ केलं माझ्यापासुन तिला।
साथ सुटली तिची तर...मित्रांनो
कसं सुंचल अन् कोण कवी म्हणलं मला...!
कवी प्रेम।
२२/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, September 19, 2018

तिचं प्रेम ते सवडीनुसार..


माझ्या प्रेमाच्या बदल्यात तिचा
तिरस्कार माझ्या नशिबी आहे।
साधं बोलणं पण महागलं तिचं
इतका मी वाईट आहे...?
कदाचित तिचं ही प्रेम असेल
पण...ते तिच्या सवडीनुसार।
अबोला तिचा जिव घेतो
अन् शब्द होतात पसार।
ती सोबत असली की
शब्दांचा कसा काहोर माजतो।
पेनाचा हुलडपणा नुसता अन्
वहीवर सहज कविता लिहितो।
कवी प्रेम।
१९/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, September 17, 2018

थोडसं तुझं ही चुकलं होतं...!


चुक फक्त माझीच नाही,
थोडसं तुझही चुकलं होत...!
एकतर्फी नव्हे दोंघाच ही
एकमेंकावर जिवापाड प्रेम होतं।
का कोणस ठाऊक पण....हल्ली
माझ्या प्रेमाचा कंटाळा आला तुला।
काय चुकलं माझं नेमंक...
एका शब्दांने तरी सांगायच मला।
मी आज ही नि:स्वार्थी
मनाने फक्त प्रेम करत राहिलो।
बोलण्यापुर्ता टायम पास तुला
अन् एक मजेदार खेळणी झालो।
कवी प्रेम।
१७/०९/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, September 14, 2018

प्रेम कळेल तुला

आज नव्हे तर उद्या पण....
नक्कीच माझं प्रेम कळेल तुला।
डोळे भरुन येतील तुझे
अन् आवाज देशील मला।
कुठं तरी कमी पडेल
कदाचित तो आवाज तुझा।
अतंरात विलिन होईल मी
अन् शेवटचा तो श्वास माझा।
कवी प्रेम।
१४/०९/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, September 11, 2018

कौतुकाची थाप

कसलीच अपेक्षा नव्हती गं
मला माझ्या प्रेमात तुझ्याकडून।
दोन शब्द प्रेमाचे फक्त अन् ती
कौतुकाची थाप तुझी माझ्या पाठीवरुन।
कवी प्रेम।
११/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, September 9, 2018

मी फक्त प्रेम केलं...!

छिडकारलेल्या प्रत्येक शब्दातं
मी फक्त प्रेम केलं।
शब्दाने कधीच नव्हे तर....
अतःकरणातुन मी फक्त प्रेम केलं।
येवढं करुन सुद्धा तिच्यासाठी
तिनं मला काय दिलं..?
आज ती नाही माझ्यासोबत
कदाचित माझं प्रेमच कमी पडलं।
तिची साथ नाही भेटली
असो तरी मला दु:ख नाही।
ती तर आहे ना सुखातं...!
मग मला काहीच लागतं नाही।
कवी प्रेम।
०९/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, September 3, 2018

काही चुकतंय का माझं...?

आज प्रत्येक नातं
माझ्यापासुन तुटतं चाललंय।
का माझ्याबरोबरचं हे असं
घडतंय का माझं काही चुकतंय..?
लय जीव घुटतोया
आज या नाते बंधनात।
नेमकं काय लिहुन
ठेवलंया माझ्या या नशिबात..?
कवी प्रेम।
०३/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/