Wednesday, June 26, 2019

पहिला पाऊस विचारतो मला

*पहिला पाऊस विचारतो मला.....!*

तो पहिला पाऊस सारखं आज
मला खुदुखुदु विचारतं होता।
कुठं गेली ती तुझी कवितेतली ती
जिच्यावर तु मनापासुन प्रेम करतं होता..?

*पहिला पाऊस विचारतो मला....!*

कुठं गेली ती नाती अन् तुझी ती।
जिवाची माणसं जी फक्त
तुझ्यासाठी धडपड करतं होती।
ना हसु तुझ्या चेहऱ्यावर आज
विरहात कविता उतरतं होती।

*पहिला पाऊस विचारतो मला...!*

कवी प्रेम।
२६/०६/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

माझी माय

*माझी माय*

प्रत्येक चुकांवर पाघरुन घालते
हे आईशिवाय कोणाला जमणार नाही।
या जगी तरी आईहुन मोठं
कोणतं ते दैवस्थान नाही।
लय लाखात एक स्वभाव
तो माझ्या माईचा हाय।
लेकराच सुखं पाहते ती
कसला कधी अंगी स्वार्थ नाय।
कवी प्रेम।
२६/०६/०१९
९६०४०००९६९

बाप माझा

*बाप माझा...!*

कसली ही परवा न करता
नेहमी सुखी ठेवतो तो बाप असतो।
आईच प्रेम ते दिसुन येतं
बाप तो कठोर दिसतो।
नेहमी प्रत्येक संकटानां
विचारपुर्वक जो सामोरं जातो
तो म्हणजे आपला तो बाप असतो।
मनी तो हळवा नेहमी
अन् चेहरा तो कठोल ठेवतो।

*असा हा आपला बाप असतो....*

असाच तो बाप माझा
त्यांचा आज वाढदिवस आहे।
संगळ्याच्या करतात साजरा ते
असा उदार मनाचा बाप माझा आहे।
तुम्हाला कायम हसतं ठेऊ
हा तुमच्या लेकरांचा शब्द आहे।
तुम्ही असंच लोकप्रिय होतं
कार्यरत जगावं हिच इच्छा।
पपा तुम्हाला उंदड आयुष्याच्या
अनंत अशा शुभेच्छा।

*शुभेच्छुक-* संपुर्ण पवळ
परिवार तसेच दळवी परिवार
कवी प्रेम।
२६/०६/०१९
९६०४०००९६९

Monday, June 24, 2019

उभ्या आयुष्यात....!

तिच्या प्रेमाची उणीव भासते
उभ्या माझ्या या आयुष्यात।
जसं बरंच काही अवलंबुन
पाऊसाच्या त्या एका थेंबात।
कवी प्रेम।
२४/०६/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, June 13, 2019

गुरुकिल्ली

नको ती अपेक्षा कधी
उगाच तिच्याकडुन खऱ्या प्रेमाची।
प्रेमाचा राजवाडा तो बघा
अन् गुरुकिल्ली टाईमपासाची।
कवी प्रेम।
१३/०६/०१९
९६०४०००९६९