Wednesday, October 24, 2018

पेन सोडतोय

मानशीक तनावामुळे हे असं
सारखं डोंक दुखंवु शक्त
तश्र्यांचा दावा आहे।
आता मी लवकरच या सर्व
गोष्टीपासुन थोडा संन्यास घेणार आहे।
या सर्व अडचणी लक्षात घेता
मला थोडे दिवस तरी..पेन
सोडावा लागतो।
आठवणीत कायम राहताल तुम्ही
सर्व तोपर्यंत मी तुमचा गुन्हेगार
ठरतोय।
*तुमचा मित्र कवी*
प्रेम।
२४/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, October 18, 2018

हॅप्पी दसरा

आपट्याच्या पानाला त्या
आज सोन्यांच मोल आहे।
हिंदू संस्कृतिचा इतिहास
बंघावा तेवढा खोल आहे।
नितीमत्ता जपुनिया आपणं
गुन्हेगारी प्रवृत्ती सारी विसरा।
हाच संदेश फक्त माझ्या अन्
माझ्या परिवारकडुन तुम्हाला
हॅपी दसरा।
कवी प्रेम।
१८/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, October 16, 2018

प्रेम कवी जन्माला आला...!


बावळंट शब्दावर तिचा
नेहमीच जोर असायचा।
अन् हाच तिचा शब्द
मला प्रेम नगरी दाखवायचा।
आज ही अठवतंय मला
ते गोड तिचं लाजणं...!
मनाला आवर घालुन
नजरेच्या भाषेत बोलणं।
मी नाही जा...असं
सारखं रागात ओरडणं।
या तिच्या स्वभावामुळेच तर..
हा प्रेम कवी जन्माला आला।
प्रत्येक पुरस्काराची हकदार ती
अन् पुरस्कार तिला अर्पण केला।
कवी प्रेम।
१६/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, October 15, 2018

खरं ती बोलायची...!


आज समजंल मला की..
खरी ती मी खोटा होतो।
माझ्यासाठी आयुष्य होती ती
तिच्यासाठी मी टाईमपास होतो।
तु निट रहा नाही तर...मी
जाईल सोडुन असं ती म्हणायची।
खोटं वाटलं मला पण...आज
लक्षात आलं खरं ती बोलायची।
भावनेच्या भरात चुकलं असेल
मग काय सोडुन जायचं असतं का..?
चुकी तर सांगायची एका शब्दात
असं गप्प बसंन शोभतं का...?
जिवापाड प्रेम केलं तुझ्यावर
तिथंच चुकलं कदाचित माझं।
दोष कसा तुला देऊ..!
सालं नशिबं पालथं माझं।
कवी प्रेम।
१५/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, October 8, 2018

एक कटु सत्य।


देव पाहतो मी मानवात
तो या दगडात नाही।
पुजतो मी नेहमी नित्तिमता
दुसरं काहीचं करत नाही।
नको गुरफटु वेड्या त्या
अंधश्रद्धेत तु मानवा।
देव तु अचारात आनं अन्...
तसं देवा सारखं वाग मानवा।
कवी प्रेम।
०८/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, October 2, 2018

संशयाची पाल चुक-चुकते


आपल्या प्रेमावर अविश्वास
दाखवणे कितपत योग्य ठरते..?
जिवापाड प्रेम ज्या व्यक्तीवर
त्याच्यावरच संशयाचे बोट जाते।
आपल्याच मनात खोट तेथे
संशयाची पाल चुक-चुकते।
कवी प्रेम।
०२/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, October 1, 2018

लय जड जाईल माझं प्रेम विसरायला।


माझं प्रेम विसरायला
लय जड जाईल तिला।
आठवणीत कायम राहिल
झोपेतुन उडवेल तिला।
मग प्रयत्न करुन बंघ
विरता येतंय का मला...?
शोधतं फिरेल ती प्रेमवेडी
मोठ्याने हाक मारतं मला।
तेव्हा प्रेम अन् प्रेमाचा विषय
माझ्यासाठी संपला असेल।
माझ्याइंतके तिच्यावर प्रेम
करणारं या जगी कुणीचं नसेल।
मी ही विसरेल तिला सरणावरती
ठेवुन जेव्हा जाळतीला मला।
तिचे ही डोंळे पानावतील एवढं
प्रेम देऊन जाईल मी तिला।
कवी प्रेम।
०१/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/