Thursday, August 30, 2018

नाते जुळले मनाचे मनाशी।


या कलियुगात खरे प्रेम
खातात बर नेमंक कशाशी..?
सहज बोलतात प्रेमवीर हल्ली
नाते जुळले मनाचे मनाशी।

कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, August 27, 2018

मुक्त होतोय

मनस्थीती ढासळली की.....
काही ही मनात येतं।
तु शेवटी एकटाच आहे
येवढंच ते लक्षात येतं।
हे जिवनाच समीकरण 
सोडवताना लय त्रास होतोय।
नकोय मला कोणतेच नाते
मी या सगळ्यातुन मुक्त होतोय।
कवी प्रेम।
२७/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, August 25, 2018

शब्दावाचुन अडले सारे

तिचे नि:शब्द ओठ होताच
उलटे वाहतात प्रेमाचे वारे।
चारोळी ही अपुर्ण राहते
जनु शब्दावाचुन अडले सारे।
कवी प्रेम।
२५/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, August 21, 2018

जीव गुंतला तुझ्यात


तु मला सोडून गेलीस
काय कमी दिसंल माझ्यात..?
तुझ्यावरच प्रेम करतो मी
कारण जीव गुंतला तुझ्यात।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, August 19, 2018

शब्द दिलास मला

शब्दरुपी कायम सोबत राहिल
असा शब्द दिलास मला।
का..? पाठ भिरवली तु
चारोळी सुंचत नाही मला।
कवी प्रेम।
१९/८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, August 15, 2018

मला जाळतील

नक्कीच मी असं नाव
कोरेल या साहित्यश्रेत्रात।
एक प्रेमवीर बनुन राहिल
या प्रेमयुगलांच्या मनात।
एक दिवस संग्रहीत त्या माझ्या
कविता वाचुन सर्व जन मला आठवतील।
जीवाला जीव देणारेचं त्या
सरणावती ठेऊन मला जाळतील।
कवी प्रेम।
१५/८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, August 14, 2018

अबोला धरला तिच्या ओठांनी

अबोला धरला आज तिच्या
त्या गोड बघा ओठांनी।
काहीच सुचेना आज मला
जनू साथ सोडली त्या शब्दांनी।
कवी प्रेम।
१४/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

नाकावरच्या रागाला

sorry या शब्दापेक्षा ही आता
किंमत आहे तिच्या नाकावरच्या रागाला।
कवडीमोल धरलं तिने सध्या
अन् माझ्या त्या प्रेमाला।
कवी प्रेम।
१४/०८/०१८
९६०४०००९६९

एकनिष्ठ राहिलो मी

सारं दु:खं विसरायचो बघ
तुला मिठीत घेतल्यावर।
एकनिष्ठ राहिलो मी नेहमीच
तुझ्यावरच्या त्या प्रेमावर।
कवी प्रेम।
१३/०८/०१८
९६०४०००९६९

तिलाच डोंळ्यासमोर ठेवतो

माझ्या बाबतीत दिवसभरातं
जे घडतं,अन् जे मनात येतं।
तेचं अगदी प्रामाणिक पणे
सहज कागदावर उतरतं।
ना कोणती चारोळी,कविता
मी कधी मुद्दाहुन करतो।
हे खरं आहे की लिहिताना मी
तिला डोंळ्यासमोर ठेवतो।
कवी प्रेम।
११/०८/१८
९६०४०००९६९

नावावर केलंय

माझ्या मनावर काहीच नाही
तुझ्याच इच्छावर चाललंय।
सारं आयुष्य माझं मी
तुझ्याच गं नावावर केलयं।
कवी प्रेम।
१०/८/०१८
९६०४०००९६९

Wednesday, August 8, 2018

नको ते विवाहिक जीवन

नकोय मला ते विवाहिक जीवन
त्यात मला बिलकुल रस नाही।
पाहतोय मी उघड्या डोळ्यांने
त्यात कुणी सुखी नाही।
कवी प्रेम।
०८/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

राग आला नकंटीचा

ती गप्प का बसली....
लय राग आलाय त्या
नकंटीचा।
बैचन मी तिच्यासाठी
अन् राग येतोय स्वतःचा।
✍कवी प्रेम✍
०८/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, August 7, 2018

मला ही वाटतं...


मला ही वाटतं की
जिच्यावर मी प्रेम करतो
तिनं प्रेम नव्हे तर फक्त
प्रेमाने माझ्यासोबत बोलावं।
*मला ही वाटतं...*
जिच्यावर मी कविता करतो
तिनं तोंडभरून माझं
कधी तरी कौतुक करावं।
*मला ही वाटत...*
नको कधी रडु गं पण...
माझ्यासाठी एकदा तरी हसावं।
*मला ही वाटतं...*
नको काढु नावं कोणापुढे
फक्त मनी माझं नाव घ्यावं।
*मला ही वाटतं......*
जिच्यामुळं मी कवी झालो
तिलाच सारं श्रेय अन् जगाला सांगावं।
*मला ही वाटतं...*

*✍कवी प्रेम✍*
०७/०८/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, August 6, 2018

लेखणीचं बळं गेलं


जिवाचं पाखरु माझं ते
आज कसं गप्प झालं।
एका क्षणात प्रेमाच माझ्या
होत्याचं कसं नव्हतं झालं।
ती गप्प होताचं जनु
माझ्या लेखाणीचं बंळच गेलं।
कवी प्रेम।
०६/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा।

रक्ताच्या नात्यापेक्षा अतूट
हे मैत्रीचे नाते असते।
रक्ताचे ते स्वार्थी सारे
नि:स्वार्थी मैत्रीचे ठरते।
कमनशिबी तो जो एखाद्याच्या
प्रेमामुळे चक्क मैत्रीला सोडतो।
लाज वाटते त्या व्यक्तीची जो
स्वर्गाच्या सुखाला लाथाडतो।
प्रेम अन् मैत्री माझ्यासाठी
एकाच नाण्यांच्या दोन बाजू।
दोन्ही असेल मजबूत तर जगाभर
आपले साम्राज्य गाजवू।
नशिबवान आहे मी मला
तुमच्यासारखे मित्र अन् तिचं प्रेम भेटलं।
जिवनाच सोनं आणि त्या
जगण्यांच पारणं फिटलं।
तुम्हा सर्व मित्रांची साथ लाभो
हिच मनी सदैव राहिल इच्छा।
माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणींना
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
कवी प्रेम।
०५/०८/०१८
९६०४०००९६९

Friday, August 3, 2018

हवा हवासा तिचा सहवास।


दिन रात्र छळतो मले
तिच्या प्रेमाचा तो भास।
माझ्यासाठी सर्व काही ती
अन् आज ही तीच आहे खास।
आठवण येताच तिची मनी
रडुनीया डोंळे लालबुंद झाले।
सांगताना प्रेमाचे किस्से मित्रांना
आज मन गहीरावुन आले।
काय दैवशक्ती या प्रेमात
प्रेमा तुझा रंग कसा।
मैलो दूरं अंतरावर असुनी
वाटे हवा हवासा तिचा सहवास।
कवी प्रेम।
०३/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, August 1, 2018

लबाड दुनिया


मतलबी सारे स्वार्थी नाते
रक्ताचे नव्हे आज सोबती।
लबाड आहे दुनिया येथे
मरतात साले फक्त पैसावरती।
काय उपयोग त्या रंगीत कागदांचा
जिवाचा जिवलग सोबत नसेल।
लाथ मारतो अशा नांत्याना
ज्यात फक्त स्वार्थ दिसेल।
कवी प्रेम।
०१/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/