Tuesday, October 31, 2017

आपल्या माणसा सोबत

संगळ्यासोबत लढू शकतो
आपल्या माणसा सोबत
लढण्याची ताकत नाही माझ्यात।
प्रेमाने वागा,बोला दुसरं काय
काही नसतं रुसव्या-फुगव्यात।
कवी प्रेम।
३१/१०/०१७
९६०४०००९६९

शुभेच्छा तिला नाही देता आल्या।

जिचं प्रेम मिळावं म्हणुन
नेहमीच मी भानगडी केल्या।
जन्मदिवस आज तिचा अन्
तिला शुभेच्छा नाही देता आल्या।
कवी प्रेम।
३१/१०/०१७
९६०४०००९६९

Monday, October 30, 2017

खूष असेल मला विसरून?

सारखं जाळते ती मला
तिचा फोटो दाखवून।
चेहऱ्यावर हसु आहे
दु:ख सारं विसरून।
का?खरंच ती खुष
असेल मला विसरून?
कवी प्रेम।
३०/१०/०१७
९६०४०००९६९

Saturday, October 28, 2017

कविता चोर

कविता लिहून पोस्ट करणं
सुद्धा आता आवघडं झालं।

चोरणारे किती संहज चोरतात कविता
जसं त्याच्या हातात पैसाचं झाड लागलं।

दुसऱ्याचं नाव खोडून
स्वतः च नाव ट्कायचं असतं का?

तुम्हीच सांगा मित्रांनो कॉपी करुन
कोणी कधी कवी होतं असतं का?

कवी प्रेम।
२८/१०/०१७
९६०४०००९६९

Thursday, October 26, 2017

घमंडी भेटतात

लय घमंडी लोक भेटतात
हो या सहित्य क्षेत्रात।
मार्गदर्शन तर सोडा ते
दुसऱ्याला कमी लेखतात।
कवी प्रेम।
२६/१०/०१७
९६०४०००९६९

Wednesday, October 25, 2017

तिला विसरण्याच्या नादात

तिला विसरण्याच्या नादात
मी स्वतःला ही विसरलो।
मन न लागे कोठे
मी माझा ना राहिलो।
कळंलच नाही मनाला
का असं होतं।
लक्षातुन गेलं माझ्या मला
काय विसरायच होतं।
कवी प्रेम।
२५/१०/०१७
९६०४०००९६९

Monday, October 23, 2017

तिचं ते गाव।

सोडतोय मी आज तिला
अन् तिचं ते गाव।
तिथं फक्त खोट्या शपथा
अन् साजुकतेचा दिसतो आव।
डोळे पाणावली चल निघतो मी काळजी
घे नकळंत सांगून गेला माझ्या मनातला भाव।
कवी प्रेम।
२४/१०/०१७
९६०४०००९६९

विसरतो तिच्या त्या नात्याला।

का कुणास ठाऊक मन
आज ही तिच्याकडंच ओढतंय।

तिच्यासोबत बोलताना आज
ही तिच्या आठवणीत रमतंय।

ती तर विसरली मला तरी
देखील तिच्यासाठीच रडतंय।

त्यामुळे तर मी टाळतोय
तिला अन् तिच्या प्रेमाला।

मनाविरुद्ध वागुन मी
विसरतोय तिच्या त्या नात्याला।

हातापाई झालो मी अन्
हात जोडले त्या नशिबाला।

लिहिता येतं होतं पण वाचता
येतं नव्हतं त्या सटविला।

कवी प्रेम।
२३/१०/०१७
९६०४०००९६९

Sunday, October 22, 2017

मतलबी सारे

मतलबी सारे नाते येथे
कामापुरता वापर करतात माझा।
जिव घुटतोय या नात्यात
एकटा पडलाय प्रेम तुझा।
कवी प्रेम।
२३/१०/०१७
९६०४०००९६९

नजरेत फसु


नको माझ्याकडे एकटक
पाहुन तु अशी हसू।
का ?उगाच गं मी
तुझ्यात त्या नजरेत फसु।
तुझ्या त्या खोट्या प्रेमाची
शाल खांद्यावर नेसु।
कवी प्रेम।
२२/१०/०१७
९६०४०००९६९

Saturday, October 21, 2017

भाऊबीजच्या शुभेच्छा

लख लखत्या पणती प्रमाणे
नेहमी तुझ्या आयुष्यात यशाचा प्रकाश पडो।
जे हवे ते तुझ्या मनाप्रमाणे
तुझ्या जिवनात नेहमी घडो।
बहिणीला मायाच लय हो
तिच प्रेम कधीच नाही जाणार वाया।
किती ही रागात आसो तरी
देखील म्हणले ओवाळते तुला भाऊराया।
(भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा)
कवी प्रेम।
२१/१०/०१७
९६०४०००९६९

लाल डब्बा संपावर जातो

लाल डब्याशिवाय मला कोणी
कधी प्रेमानं बोललं का?

आमच्या कर्मचाऱ्याविषयी कधी
तुम्हाला हेवा वाटला का?

ड्रायवर माझा रात्रदिवस डोळ्यात तेल घालुन तुम्हाला सुखरूप घरी सोडतो।

तो जिव धोक्कयात घालुन जगतो।
त्याला त्याचा किती दाम भेटतो?

त्या मिळणाऱ्या दोन पैश्यात
संसाराचा गाडा कसा चालवतो।

जनतेला वेढीस नाही धरलं
आम्ही सरकारला धरतो।

आज कळलं असेल या सरकारला
काय होतं जेव्हा लाल डब्बा संपावर जातो।

कवी प्रेम।
२०/१०/०१७
९६०४०००९६९

Thursday, October 19, 2017

लक्ष्मीपुजनाच्या शुभेच्छा

आज कोण खऱ्या अर्थाने
येथे लक्ष्मीला पुजतोय।
कसल काय आल राव
तो फक्त परंपरेला जपतोय।
येरवी तर लक्ष्मी कमवण्यासाठी
स्वतःची नितीमता मात्र विसरतो।
माणसाच काय हो तो
फक्त जशाच तसं वागतो।
फक्त साफ मन ठेवा
लक्ष्मीलाच वाटेल तुमचा हेवा।
(माझ्या सर्व लडक्या मित्र
मैत्रीणीनां लक्ष्मीपुजनाच्या
खुप साऱ्या शुभेच्छा)
कवी प्रेम।
१९/१०/०१७
९६०४०००९६९

Wednesday, October 18, 2017

दिपावलीच्या शुभेच्छा

आजपासून प्रत्येकाच्या
घरात होणार गोड धोड फराळ//१//

फराळाच्या नादात निघणार
हो संगळ्याच दिवाळ//२//

चिमुकल्याच्या सुखासाठी साजरी
करतो आम्ही ही दिवाळी//३//

जपून ठेवलेली पैई पैई
काढतो ठेवलेली कधीकाळी//४//

सर्वत्र दिवा झळकतोय येथे
घेऊन आला एक चकाकी वेगळी//५//

भर तानातानीतच येतो हा सन
किती छान नाव त्याच दिवाळी//६//

प्रत्येक सन रितीप्रमाणे आपण
हो साजरा केला पाहिजे//७//

विनाकारण खर्च मात्र या
दिवाळीत आपण टाळला पाहिजे।
//८//

आपल्याकडुन निसर्गाची हानी
होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे//९//

म्हणजेच फटाके नको रे
विना प्रदूषण करता दिवाळी साजरी केली पाहिजे//१०//

बघा जमतय का मनात जे आल
ते सांगितल हिच माझी ईच्छा//११//

दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडुन
आणि माझ्या परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा//१२//

कवी प्रेम।
१८/१०/०१७
९६०४०००९६९

Sunday, October 15, 2017

केलं परखं

काही तरी मनात माझ्या
टोचतय हो सारखं।
ज्याने जिव लावला जादा
त्यानेच आज का केलं परखं?
कवी प्रेम।
१५/१०/०१७
९६०४०००९६९

Saturday, October 14, 2017

सुंचतात शब्द मला

प्रेमात आहे म्हणुन तर
सुचतात हो शब्द मला।
अन् वाचायला भेटतात
या चारोळ्या तुम्हाला।
कवी प्रेम।
१५/१०/०१७
९६०४०००९६९

Friday, October 13, 2017

पहिलं प्रेम

बरंच काही शिकुन जात
माणसाला त्याच पहिलं प्रेम।
कधी कोनासोबत होईल
त्याचा काहीच नसतो नेम।
कवी प्रेम।
१३/१०/०१७
९६०४०००९६९

Wednesday, October 11, 2017

तुम्हे गया भुल

आज भी संभालकर रखा है
मैने ओ गुलाब का फुल।
जो मुझे कहता है हमेशा याद
मत कर उसे जो तुम्हे गया भुल।
कवी प्रेम।
१२/१०/०१७
९६०४०००९६९

Tuesday, October 10, 2017

विश्वास नाही प्रेमावर!

नका हो काढू प्रेम
अन् प्रेमाचा विषय धरतीवर।
सारे मतलबी येथे झाले
विश्वास नाही आता प्रेमावर।
कवी प्रेम।
१०/१०/१७
९६०४०००९६९

Sunday, October 8, 2017

नुसतं गप्प राहते तु

हल्ली नुसतं गप्प राहते तु
काहीच कशी बोलत नाही।
कोणी तरी आपल्यावर मरतंय
ठाऊक आहे ना का?ते ही आठवतं नाही।
काही तरी बोल गं
मला काहीच सुंचत नाही।
कवी प्रेम।
०८/१०/०१७
९६०४०००९६९

Saturday, October 7, 2017

ते गोड इशारे।

उमजले होते मला ही
तुझे ते गोड इशारे।
तुझ्या त्या इशाऱ्या मुळे
तर जग जगुन झाले सारे।
कवी प्रेम।
०८/१०/०१७
९६०४०००९६९

एकदा भेटुन जा।

तुझ्याविना कविता अपुर्ण माझी
थोडे शब्द देऊन जा।
अधुरा आहे तुझ्याशिवाय मी
कधीतरी एकदा भेटुन जा।
कवी प्रेम।
०७/१०/०१७
९६०४०००९६९

लक्ष असु दे

तुझं ही लक्ष असु दे
लेखणीकडे माझ्या नको घेऊ अशी माघार।
तुझ्यामुळेच सुंचतात शब्द मला
नाही तर कशी कविता होणार?
तुचं असं वागली तर...? मी
या कलीयुगात कसा गं एकटा जगु।
तुझीच साथ नसेल तर...?
कसा या दुनियेशी एकटा लढु।
कवी प्रेम।
०६/१०/०१७
९६०४०००९६९


Wednesday, October 4, 2017

एक नजर तुझी

तुझी एक नजर गं
आज ही मला आठवते।
तुला डोळयांसमोर ठेऊनच
माझी कविता पुर्ण होते।
कवी प्रेम।
०४/१०/०१७
९६०४०००९६९

Tuesday, October 3, 2017

चांदण्यात फिरताना

आज ही आठवण येते
मी चांदण्यात फिरताना।
हरवल्यासारखं वाटतं बंघ
तु सोबत नसताना।
कवी प्रेम।
०३/१०/०१७
९६०४०००९६९