Tuesday, November 28, 2017

सुवर्णाक्षर

तुझ्यावरती चारोळी करतो त्याचे
गुणगान सर्वत्र होते सुवर्णाक्षर।
शाळेत असताना मढ मी
आता मात्र झालो साक्षर।
कवी प्रेम।
२८/११/०१७
९६०४०००९६९

Monday, November 27, 2017

मानवता


या कलियुगात माणुस
विसरुन गेलाय नित्तीमता।
पैसाला सर्वस्व मानतो
कोण जपतो मानवता?
कवी प्रेम।
२७/११/०१७
९६०४०००९६९

Sunday, November 26, 2017

विष पिला!

भिजताना देह माझा
बरंच काही सांगुन गेला।
ती तुझी नव्हती कधीच
अन् तु तिच्यासाठी विष पिला?
कवी प्रेम।
२६/११/०१७
९६०४०००९६९

Saturday, November 25, 2017

हुकुमशाही वाटली तिला

जिवापाड प्रेम होतं माझं
हुकुमशाही वाटली तिला।
ती तर संहज विसरली
त्रास फक्त होतो मला।
कवी प्रेम।
२५/११/०१७
९६०४०००९६९

Friday, November 24, 2017

गोडवा तुझ्या सोबतीचा।

आज ही नकळंत स्पर्श
करुन जातो गंध तुझ्या प्रेमाचा।
नकळंत आठवतो मला तो
गोडवा तुझ्या सोबतीचा।
कवी प्रेम।
२४/११/०१७
९६०४०००९६९

Wednesday, November 22, 2017

जपून ठेवलंय घरटे

आज ही जपून ठेवलंय
तुझ्या प्रेमाचे ते घरटे।
फक्त फुलांचा सुंगध तेथे
नजरे आड ठेवतो सराटे।
कवी प्रेम।
२२/११/०१७
९६०४०००९६९

Tuesday, November 21, 2017

परिभाषा त्यागाची।


प्रेमाचं किती निर्मळ नातं
उपमा त्याला लफड्याची।
खरं प्रेम करणारा जाणतो
किंमत अन् परिभाषा त्यागाची।
कवी प्रेम।
२१/११/०१७
९६०४०००९६९

Monday, November 20, 2017

जिभेचा चावटपणा

तुझ्यासोबत बोलताना मी थोडा
विचार करायला हवा होता।
जिभेचा मात्र चावटपणा तिचा
तोल सावरतं नव्हता।
कवी प्रेम।
२०/११/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, November 19, 2017

जिवन बहरणारी बाग

प्रेम अन् प्रेमाचा विषय
म्हणजे जिवन बहरणारी बाग।
वाटते तेवढे सोपे नाही
त्यात नुसती असते आग।

कवी प्रेम।
१९/११/०१७
९६०४०००९६९

Friday, November 17, 2017

नि:शब्द


नि:शब्द गं ओठ तुझे
सांगून जातात बरेच काही।
गप्प राहून माझ्या मनातलं
ओळखतात ते सारं काही।
कवी प्रेम।
१७/११/०१७
९६०४०००९६९

Thursday, November 16, 2017

पुन्हा नव्याने

पुन्हा नव्याने लेखणी
माझ्या हातात घेतोय।
करणुक तुमची पण
मी मात्र रडतोय।

कवी प्रेम।
१६/११/०१७
९६०४०००९६९

Wednesday, November 15, 2017

प्रेम केले गुन्हा नाही


खुप वेळा प्रपोज केलं
बिलकुल भाव देत नाही।
कसं सांगु तिला मनातल
प्रेम केले गुन्हा नाही।
कवी प्रेम।
१५/११/०१७
९६०४०००९६९

Tuesday, November 14, 2017

अबोल प्रित।

नजरेत तुझ्या प्रेम
अबोल प्रित गं तुझी।
बोलुन दाखवं गं
घुसमट होते माझी।
कवी प्रेम।
१४/११/०१७
९६०४०००९६९

Monday, November 13, 2017

तुझ्याकडं पाहुन जगतो।

प्रेमात सारं माफ असत मग
का माफ करत नाहीस मला!
तुझ्याकडं पाहुनच जगतोय गं
याचं काहीच वाटतं नाही तुला?
कवी प्रेम।
१३/११/०१७
९६०४०००९६९

अर्धसत्य।

प्रेमाचा आंनद जसा हो
इंद्र दरबारी रंभेच नुत्य।
प्रेमात पडला की रडतो
प्रत्येक जन हेच अर्धसत्य।
कवी प्रेम।
९६०४०००९६९

Sunday, November 12, 2017

नकळत जाते राहून काही।

ती समोर आली की
विसरतात माझे शब्द काही।
बोलायचे खुप असतं तिला
नकळत जाते राहुन काही।
कवी प्रेम।
१२/११/०१७
९६०४०००९६९

Friday, November 10, 2017

वेगळी घडणं तुझी।

तुचं उर्वसी,मेनका
तुचं रंभा गं माझी।
कसं बनवलं तुला देवाने
एक वेगळी घडणं तुझी।
कवी प्रेम।
१०/११/०१७
९६०४०००९६९

Thursday, November 9, 2017

टायमपास करतात हरामी


प्रेमाचं नाव जरी घेतलं
राधा-कृष्ण आठवतात//१//

हल्ली कसंल आलं प्रेम फक्त
मुल-मुली टायमपास करतात//२//

या मुला मुलींनी तर प्रेमाच
नाव बदनाम केलंय हल्ली//३//

प्रेम या पवित्र नात्याची किती
संहज उडवतात खिल्ली//४//

अशा मुला -मुलींमुळे तर
आमच्यासारख्याची होते बदनामी//५//

स्वार्थी सारे मतलबी
साले मुकाट सुटले हरामी//६//

कवी प्रेम।
०९/११/०१७
९६०४०००९६९

Wednesday, November 8, 2017

भिंगरी


तुझ्या भोवतीच माझ्या
मनाची रोजचं फिरते गं भिंगरी।
संमजुन घे मनाला माझ्या
अन् संमजुन घे प्रेमाची थेरी।
कवी प्रेम।
०८/११/०१७
९६०४०००९६९

Tuesday, November 7, 2017

ती बोलणं टाळते

का कुणास ठाऊक पण
ती माझ्याशी बोलणं टाळते।
कसलाच भाव देत नाही तरी
माझं मनं तिच्याकडेच का वळते?
कवी प्रेम।
०७/११/०१७
९६०४०००९६९

Monday, November 6, 2017

दुसऱ्यावर प्रेम करते

तिची ती तिरकी नजर
मला भरपुर शिकुन जाते।
ती कधीच माझी नाही
होणार हे न कळंत सांगून जाते।
नको जिवाला मारु उगाच
ती तुझ्यावर नाही तर
दुसऱ्यावर प्रेम करते।
कवी प्रेम।
०६/११/०१७
९६०४०००९६९

Sunday, November 5, 2017

मनाची घुसमट

तुझ्या त्या आठवणीत माझी
मनाची घुसमट होते हल्ली।
आज ही तुझ्या नावाने
चिडवतात मला गल्ली ते दिल्ली।
कवी प्रेम।
०५/११/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, November 4, 2017

अंतरातल्या वेदना

किती प्रेम करतो तुझ्यावर
मला संमजुन घे ना।
कधी दिसतील गं तुला
माझ्या अतंरातल्या त्या वेदना।
कवी प्रेम।
०४/११/०१७
९७०४०००९६९

Friday, November 3, 2017

चल सजणी।


नजरेत तुझ्या लय प्रेम
किती गोड तुझी वाणी।
जीवनसाथी होशील माझी?
पत्नी बनुन चल सजणी।
कवी प्रेम।
०३/११/०१७
९६०४०००९६९


Thursday, November 2, 2017

बागुलबुवा

माझ्या मनाला समजून घे
नको बनु तु हळवा।
खोटं प्रेम दाखवते ती
जगासमोर बनते बागुलबुवा।
कवी प्रेम।
०२/११/०१७
९६०४०००९६९

Wednesday, November 1, 2017

मन उधाण वाऱ्याचे

भरकटु नका प्रेमात उगाच
काही खरं नाही प्रेमाचे।
सावरा हो स्वतःला तुम्ही
कारण मन उधाण वाऱ्याचे।
कवी प्रेम।
०१/११/०१७
९६०४०००९६९