Friday, April 26, 2019

परतफेड माझ्यावर

सोडलंय मी आज तिच्या
सवडीनुसार ते प्रेम करणं।
इच्छा नसताना ही तिची
विनाकारण तिला त्रास देणं।
प्रेम तर करतोय अन् करतं
राहिलं मी मरेपर्यंत तिच्यावर।
ना तिच्याकडुन अपेक्षा ती
कधी परतफेडीची माझ्यावर।
खरचं मी वेडा आहे
माझा नाद सोडा तुम्ही...!
एकदा मनात बसली ना तर
तिच्यावरच शेवट करतो आम्ही...!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२६/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

वाटलंच नव्हतं कधी मला

*वाटलंच नव्हतं कधी मला...*

वाटलंच नव्हतं कधी मला
मी ही प्रेमात धोका खाईल...!
नादान तो गोड चेहरा तिचा
मला एक दिवस धोका देईल।

*वाटलंच नव्हतं कधी मला..*

ती फक्त माझीच असा
तो माझा गैरसमज होता...!
प्रेम तर हा तिच्यासाठी
फक्त मजेदार खेळ होता।

*वाटलंच नव्हतं कधी मला..*

मी प्रेम कवी एक दिवस
प्रेमाचा इतका तिरस्कार करेल।
अन् तिचं ते प्रेम फक्त
आठवणीतचं  उरेल।

*वाटलंच नव्हतं कधी मला...!*
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, April 16, 2019

अनंत शुभेच्छा

एकमेंकाची साथ तुमची ती अतुट
बंधनात गुंतत जावो हिच मनी इच्छा।
उदंड संसारीक आयुष्याला माझ्या
कडुन दादासाहेब आणि वहिनी
साहेबांना अनंत अशा शुभेच्छा।
कवी प्रेम।
१८/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

अनंत शुभेच्छा

एकमेंकाची साथ तुमची ती अतुट
बंधनात गुंतत जावो हिच मनी इच्छा।
उदंड संसारीक आयुष्याला माझ्या
कडुन दादासाहेब आणि वहिनी
साहेबांना अनंत अशा शुभेच्छा।
कवी प्रेम।
१८/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Sunday, April 7, 2019

प्रेम कसं उतरु शकतं...?

मनात विरह असताना तो
कवितेत प्रेम कसं उतरु शकतं...?
जुनी मन आठवली ती
ज्याचं जळतं त्यालाच कळतं।
कवी प्रेम।
०७/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, April 6, 2019

नव वर्ष नवा संकल्प

नव वर्ष नवा संकल्प करु..!
सोडुन तिचा तो फक्त
स्वतःचा विचार करु...!
मतलबी आहे दुनिया येथे
ना आपलं कोणीच हो
पैसा तो सर्वस्व येथे...!
प्रेमाची गुढी नव्हे मी
आज नात्याची गुढी उभारतोय।
स्वार्थी त्या लोंकापासुन मी
कायमचा दुरु जातोय।
कवी प्रेम।
०६/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Tuesday, April 2, 2019

प्रेमावर लिहितं आलो

प्रेम कवी मी फक्त आजवर
प्रेमावरच लिहित आलो।
प्रियेसीच्या त्या प्रेमात
अगदी आंधळा झालो।
आज पहिल्यांदा विरहात
लिहिण्याला धाडस मी करतोय।
तिने दिलेल्या सुखा दुखाची
आज एकटाच जुळवणी करतोय।
कवी प्रेम।
०२/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

थोडं तिचं ही चुकलं होतं...!

फक्त माझंच नाही हो
थोड तिचं ही चुकलं होतं।
एकतर्फी नव्हे ते प्रेम
थोड तिचं ही माझ्यावर होतं।
शिक्षा फक्त मलाच ती
विरहाची आज भेटली।
असुन गुन्हेगार ती सुदा
ती कशी निर्दोष सुटली...?
कवी प्रेम।
०२/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, April 1, 2019

विरहच फक्त

ना शब्द ना कोणता
भाव तो कवितेत येतो।
विरहच फक्त तिचा
जो चेहऱ्यावर ही दिसतो।
कवी प्रेम।
०१/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

वेदनेच्या पाऊलखुणा.....!


चुक केली तुझ्यावर जिवापाड
प्रेम केलं माफ कर मला.....!
नक्कीच आठवुन रडशील तु
एकदिवस प्रेमाची किंमत कळेल तुला।
पण त्या वेळेस कदाचित
मी या जगात नसेल।
स्वतःला दोष देण्यापलीकडे
तुझ्याकडे कोणताच पर्याय नसेल।
थडग्यावर माथा ठेऊनिया
तु तुझ्या प्रेमाची कबुली देशील।
ना कसला आवाज ना तो
तुझा स्पर्श मला जाणवेल।
नको तुझी घुसमट ना घरच्यांची
सर्वांनाच मुक्त करतोय मी आता।
सहनशीलतेचा अंत माझ्या
मरणाला कवटाळतो आता।
कवी प्रेम।
०१/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in