Tuesday, December 24, 2019

मुख्यमंत्री कोण असेल..?



मुख्यमंत्री कोण असेल...?

दिवसेंदिवस आज लोकशाहीत

हुकुमशाहीचा सहवास नांदतो।

पदाची हाव ती अन्

मुख्यमंत्री पदासाठी वाद होतो।

काय असेल उद्याच भविष्य

ते काय समजतं नाही...!

राजकारणी गुरु हे अन्

पदाची हाव यांना सुटतं नाही।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

सुत्र ते मुख्यमंत्री पदाचे..!



सुत्र ते मुख्यमंत्री पदाचे...!

सुत्र ते मुख्यमंत्री पदाचे

आज ही त्यांच्याकडेच आहेत।

कमजोर समजलं त्यांना काल

तेच करविता ठरतं आहेत।

कोणाला ही कमी समजू नये

या कधी त्या राजकारणात।

कोणी ही भारी पडू शकतं

भविष्यात या राजकारणात।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

मुख्यमंत्रीचे सुत्र ते



मुख्यमंत्रीचे सुत्र ते

मुख्यमंत्रीचे सुत्र ते

याच्या आज हातात आले।

नवाजले ते आज कसे..?

नावानिराळे होतं गेले।

मुख्यमंत्री तो जनहिताचा

आज असला पाहिजे....!

सर्वसामान्यां सोडा हो

पक्षांने विचार केला पाहिजे।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

मुख्यमंत्री पदाचा आवमेळ



मुख्यमंत्री पदाचा आवमेळ..

मुख्यमंत्री पदाचा तो आवमेळ

आज ही तसाच आहे.....!

जो त्याच्या लायक त्याचेच

आज खच्चीकरण होतं आहे।

मुख्यमंत्री म्हणलं की नुसता

खाऊचा बाजार झाला वाटतं।

विकासाच्या नावाने शून्य

अन् पदाला यांच मनं भावलं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

काडीमोड ती



काडीमोड ती

बऱ्याचं दिवसाच्या त्या संसाराची

एका क्षणात ती काडीमोड होऊ शकते।

संसार तो कमी म्हणून दुसऱ्या

सोबत करण्याची वेळ येते।

संसारात दोघांनी ही एकमेकांना

ते समजून घ्यायचं असतं।

एका ने तापलं की

दुसऱ्यांनी थंड व्हायचं असतं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

५०-५० चा फॉर्मूला



५०-५० चा फाॅर्मुला

भाऊ भावात काल तो ५०- 

५०चा फाॅर्मुला झाला होता।

दोघे ही खुश होते काल

राजकारणीय डावपेच बाकी होता।

बोललं तस वागायचं नसतं

यालाच अर्थात राजकारण म्हणतात

प्रतिभा आणि पैसा पणाला या

राजकारणा पायी सगळे सोयरे

तुटतात।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

जनमतातुन मुख्यमंत्री हवा



जनमतातून मुख्यमंत्री हवा

मुख्यमंत्री पदाची घीस घीस

ती ना कोणाचीच येथे माघार आहे।

चर्चेचा नुसता धिंगाणा होतो

हाच लोकशाहीचा फाॅर्मूला आहे।

नको ते यांच्यात हातात पदाचा

कारभार जनमतातून मुख्यमंत्री हवा होता।

सत्ता ही स्थिर झाली असती

मुख्यमंत्री ही चांगला निवडला असता।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

राजवट ती भिती



राष्ट्रपती राजवट ती भिती.....

सत्ता स्थापनेचा तो वाद 

आज शिगेला गेला आहे।

कोणाचीच माघार नाही येथे

जो तो मी वर आडला आहे।

स्थिर सत्तेचा सहवास हवा

सर्वसामान्यं जनतेचा आवाज येतो।

भाऊ भावा येथे उघड उघड

राष्ट्रपती राजवटची ती भिती

दाखतो।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

लोकशाहीचं वस्रहरण



लोकशाहीचं वस्त्रहरण..

स्थिर सत्ता स्थापनेचा वाद जणू

लोकशाहीचं वस्त्रहरण करतं आहे।

लोकशाहीची ती वाटचाल जणू

हुकुमशाहीकडे असं बोललं जातं आहे।

स्थिर सरकार हवं उद्या मध्यवर्ती

निवडणुका लय महागात

पडतात।

मतदाराची ती कोंडी होते यात

मतदार पैशावर राजकारणी नाचवतात।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

तोच बाक हवा



तोच बाक हवा...

त्यांना सत्तेचा बाक ,

यांना हवा विरोधी बाक।

सत्तेवर बसण्यापेक्षा तो,

विरोधी बाकच ईमानदारी असतो।

सत्तेची ती हवा डोक्यातली

तो विरोधक काढत असतो।

सत्तास्थापनेचा तो राडा

आज ही तसाचं आहे।

मित्रपक्षाची ती डिमांड

आहे तिचं आज ही आहे।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

दादांचा गौम्यस्पोट



दादांचा गौम्यस्पोट...

त्यांच ठरलं तसं ते

आमचं ही ठरलं होतं।

सर्वांच्या बोलण्यांने आम्हाला

ते यांच्यासोबत जायचं होतं।

मला एकटं पाडण्याचा तो 

जेष्ठ नेत्यांची आज खेळी आहे।

दोंन दिवस गप्प राहिलेला हा

मोहरा आज बेधडक बोलतं आहे।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

सारीपाटावरच्या खेळी



सारीपाटावरच्या खेळी

सारीपाटावरच्या खेळी खेळण्यात

काही मोहरे लय माहिर आहेत..!

यांची ती चाल खेळून झाली की

ते लगेच दुसरी चाल चालत आहेत।

जणू सोंगट्याचा खेळ हा आज

राजकारणात खेळला जातोय।

यांच्या त्या सारीपाटावरच्या

खेळात मात्र सारा महाराष्ट्र

होरपळला जातोय..!

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com/

Friday, August 23, 2019

लोण्याची चोरी

लोण्याची जसी चोरी तसी हा
प्रेमाची ही सहज करतं होता।
मनी मनी गोपीकांच्या तो
जसा वारंवार ठसतं होता।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२४/०८/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

पाहता क्षणी तुला

तुला पाहता क्षणी माझं
काय होतं हे मलाच कळतं नाही।
शब्दाचा तो काहोर माजतो मनी
काय लिहावं हे जुळतं नाही।
तुला माझ्या त्या मनातलं
बरंच काही सांगावसं वाटतं..!
भिती ती दुर जाण्याची तु अन्
मनाच घोडं ते मनातच आडतं।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

लाजुन हसणे

लाजुन हसणे अन् ते
तुझे हसून ते पाहणे।
मी ओळखुन ते आहे
तुझ्या प्रेमाचे ते बहाने।
तुला पाहिल्या नंतर बघ
गुलाबाला ही कळी आली।
तुला पाहता क्षणी माझ्या
ह्रदयात नकळंत ती विरुन गेली।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

समजु शकली नाहीस

आरे तुच समजु शकली नाहीस
मला तेवढं तरी बरं होतं।
किती ते तुचं खरं प्रेम
खरं ते माझं होतं।
नादान होता चेहरा तुझा
तो मी ओळखु शकलो नाही।
तुझ्या त्या अशा प्रेमाला
मी कधीच समजु शकलो नाही।
किती सहजरित्या प्रेमाचं ते
नाटक रंगवलं होतंस तु।
माझ्या त्या भावनांना
अगदी अलगद दुखवलं गं तु।
आज माझ्या अशा परिस्थितीला
सारे तुलाच गं दोषी ठरवतात.!
मी नाही कारण खरं प्रेम करणारे
फक्त प्रेमचं करतं राहतात..!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२३/०८/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, July 15, 2019

ती म्हणते....

ति म्हणते आपण बोलणं
ते बदं करु अभ्यास होतं नाही।
केला जरी अभ्यास भरपुर
लक्षात बिलकुल राहतं नाही।
बोललेच एकदा मी तर....
सारंखच बोलावसं मला वाटतं।
आठवण तुझी ती कायम
अन् अभ्यासाच घोडं आडतं।
बच्चु ती बच्चुच आहे बरं
अगदी लहान बाळासारखं वागतीया।
डोळ्यांसमोर मी नेहमी अन्
तोंडावर पडुन अभ्यास करतीया..!
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

जिवापाड प्रेम करते

ती स्वतःपेक्षा जास्त अन्
जिवापाड प्रेम करते माझ्यावर..!
जसं की ती राधा करतं
होती त्या सावळ्या कृष्णावर..!
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

चेहऱ्यावर हसु बंघायचंय

फक्त तिच्या चेहऱ्यावर
नेहमी मला हसू बघायचं आहे..!
तिच्या त्या श्वासात नव्हे तर..
ह्रदयात स्थान मिळवायचं आहे।
प्रेमाला ही लाज वाटेल असं
जिवापड प्रेम देईल तिला।
ति फक्त आनंदात राहो
दुसरं काय हवं मला...?
जिवापाड प्रेम आहेच तिच्यावर
त्याहुन जास्त तिचा आदर करतो।
प्रत्येक कविता/चारोळीत फक्त
तिलाच उतरवण्याच्या प्रयत्न करतो।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

गुप्त भाषा

नजरेच्या त्या गुप्त भाषेत
काही तरी ती सांगत होती।
जिवाची माझ्या उलघाल
अन् तिच्या ही होतं होती।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

नजरेला नजर झाली

आज बऱ्यांच दिवसातुन तिची
अन् माझी नजरेला नजर झाली।
तिला पाहताच माझी ती
नकळत पापणी पानावली..!
आज ही माझ्यावर प्रेम तिचं
नजरेत मला स्पष्टपणे दिसतं होतं।
नि:शब्द ओठ तिचे ते..अन्
घरच्यांना मन घाबरतं होतं।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

तिला एकदा भेटायचंय...!


तिच्याबद्दल काय आहे मनात
हे तिला समोरा-समोर सांगायचंय।
नको चारचौघात ती भेट
एकदा मला एकांटी भेटायचंय..!
सारं काही आवडतंय तिचं मला
फक्त एक ते बदलायचंय।
बास झालं तिचं ते आडनाव
फक्त तेवढं आता बदलायचंय।
अन् सारं बोलण्यासाठी फक्त
एकदा मला तिला भेटायचंय..!
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, June 26, 2019

पहिला पाऊस विचारतो मला

*पहिला पाऊस विचारतो मला.....!*

तो पहिला पाऊस सारखं आज
मला खुदुखुदु विचारतं होता।
कुठं गेली ती तुझी कवितेतली ती
जिच्यावर तु मनापासुन प्रेम करतं होता..?

*पहिला पाऊस विचारतो मला....!*

कुठं गेली ती नाती अन् तुझी ती।
जिवाची माणसं जी फक्त
तुझ्यासाठी धडपड करतं होती।
ना हसु तुझ्या चेहऱ्यावर आज
विरहात कविता उतरतं होती।

*पहिला पाऊस विचारतो मला...!*

कवी प्रेम।
२६/०६/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

माझी माय

*माझी माय*

प्रत्येक चुकांवर पाघरुन घालते
हे आईशिवाय कोणाला जमणार नाही।
या जगी तरी आईहुन मोठं
कोणतं ते दैवस्थान नाही।
लय लाखात एक स्वभाव
तो माझ्या माईचा हाय।
लेकराच सुखं पाहते ती
कसला कधी अंगी स्वार्थ नाय।
कवी प्रेम।
२६/०६/०१९
९६०४०००९६९

बाप माझा

*बाप माझा...!*

कसली ही परवा न करता
नेहमी सुखी ठेवतो तो बाप असतो।
आईच प्रेम ते दिसुन येतं
बाप तो कठोर दिसतो।
नेहमी प्रत्येक संकटानां
विचारपुर्वक जो सामोरं जातो
तो म्हणजे आपला तो बाप असतो।
मनी तो हळवा नेहमी
अन् चेहरा तो कठोल ठेवतो।

*असा हा आपला बाप असतो....*

असाच तो बाप माझा
त्यांचा आज वाढदिवस आहे।
संगळ्याच्या करतात साजरा ते
असा उदार मनाचा बाप माझा आहे।
तुम्हाला कायम हसतं ठेऊ
हा तुमच्या लेकरांचा शब्द आहे।
तुम्ही असंच लोकप्रिय होतं
कार्यरत जगावं हिच इच्छा।
पपा तुम्हाला उंदड आयुष्याच्या
अनंत अशा शुभेच्छा।

*शुभेच्छुक-* संपुर्ण पवळ
परिवार तसेच दळवी परिवार
कवी प्रेम।
२६/०६/०१९
९६०४०००९६९

Monday, June 24, 2019

उभ्या आयुष्यात....!

तिच्या प्रेमाची उणीव भासते
उभ्या माझ्या या आयुष्यात।
जसं बरंच काही अवलंबुन
पाऊसाच्या त्या एका थेंबात।
कवी प्रेम।
२४/०६/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, June 13, 2019

गुरुकिल्ली

नको ती अपेक्षा कधी
उगाच तिच्याकडुन खऱ्या प्रेमाची।
प्रेमाचा राजवाडा तो बघा
अन् गुरुकिल्ली टाईमपासाची।
कवी प्रेम।
१३/०६/०१९
९६०४०००९६९

Friday, April 26, 2019

परतफेड माझ्यावर

सोडलंय मी आज तिच्या
सवडीनुसार ते प्रेम करणं।
इच्छा नसताना ही तिची
विनाकारण तिला त्रास देणं।
प्रेम तर करतोय अन् करतं
राहिलं मी मरेपर्यंत तिच्यावर।
ना तिच्याकडुन अपेक्षा ती
कधी परतफेडीची माझ्यावर।
खरचं मी वेडा आहे
माझा नाद सोडा तुम्ही...!
एकदा मनात बसली ना तर
तिच्यावरच शेवट करतो आम्ही...!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२६/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

वाटलंच नव्हतं कधी मला

*वाटलंच नव्हतं कधी मला...*

वाटलंच नव्हतं कधी मला
मी ही प्रेमात धोका खाईल...!
नादान तो गोड चेहरा तिचा
मला एक दिवस धोका देईल।

*वाटलंच नव्हतं कधी मला..*

ती फक्त माझीच असा
तो माझा गैरसमज होता...!
प्रेम तर हा तिच्यासाठी
फक्त मजेदार खेळ होता।

*वाटलंच नव्हतं कधी मला..*

मी प्रेम कवी एक दिवस
प्रेमाचा इतका तिरस्कार करेल।
अन् तिचं ते प्रेम फक्त
आठवणीतचं  उरेल।

*वाटलंच नव्हतं कधी मला...!*
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, April 16, 2019

अनंत शुभेच्छा

एकमेंकाची साथ तुमची ती अतुट
बंधनात गुंतत जावो हिच मनी इच्छा।
उदंड संसारीक आयुष्याला माझ्या
कडुन दादासाहेब आणि वहिनी
साहेबांना अनंत अशा शुभेच्छा।
कवी प्रेम।
१८/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

अनंत शुभेच्छा

एकमेंकाची साथ तुमची ती अतुट
बंधनात गुंतत जावो हिच मनी इच्छा।
उदंड संसारीक आयुष्याला माझ्या
कडुन दादासाहेब आणि वहिनी
साहेबांना अनंत अशा शुभेच्छा।
कवी प्रेम।
१८/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Sunday, April 7, 2019

प्रेम कसं उतरु शकतं...?

मनात विरह असताना तो
कवितेत प्रेम कसं उतरु शकतं...?
जुनी मन आठवली ती
ज्याचं जळतं त्यालाच कळतं।
कवी प्रेम।
०७/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, April 6, 2019

नव वर्ष नवा संकल्प

नव वर्ष नवा संकल्प करु..!
सोडुन तिचा तो फक्त
स्वतःचा विचार करु...!
मतलबी आहे दुनिया येथे
ना आपलं कोणीच हो
पैसा तो सर्वस्व येथे...!
प्रेमाची गुढी नव्हे मी
आज नात्याची गुढी उभारतोय।
स्वार्थी त्या लोंकापासुन मी
कायमचा दुरु जातोय।
कवी प्रेम।
०६/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Tuesday, April 2, 2019

प्रेमावर लिहितं आलो

प्रेम कवी मी फक्त आजवर
प्रेमावरच लिहित आलो।
प्रियेसीच्या त्या प्रेमात
अगदी आंधळा झालो।
आज पहिल्यांदा विरहात
लिहिण्याला धाडस मी करतोय।
तिने दिलेल्या सुखा दुखाची
आज एकटाच जुळवणी करतोय।
कवी प्रेम।
०२/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

थोडं तिचं ही चुकलं होतं...!

फक्त माझंच नाही हो
थोड तिचं ही चुकलं होतं।
एकतर्फी नव्हे ते प्रेम
थोड तिचं ही माझ्यावर होतं।
शिक्षा फक्त मलाच ती
विरहाची आज भेटली।
असुन गुन्हेगार ती सुदा
ती कशी निर्दोष सुटली...?
कवी प्रेम।
०२/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, April 1, 2019

विरहच फक्त

ना शब्द ना कोणता
भाव तो कवितेत येतो।
विरहच फक्त तिचा
जो चेहऱ्यावर ही दिसतो।
कवी प्रेम।
०१/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

वेदनेच्या पाऊलखुणा.....!


चुक केली तुझ्यावर जिवापाड
प्रेम केलं माफ कर मला.....!
नक्कीच आठवुन रडशील तु
एकदिवस प्रेमाची किंमत कळेल तुला।
पण त्या वेळेस कदाचित
मी या जगात नसेल।
स्वतःला दोष देण्यापलीकडे
तुझ्याकडे कोणताच पर्याय नसेल।
थडग्यावर माथा ठेऊनिया
तु तुझ्या प्रेमाची कबुली देशील।
ना कसला आवाज ना तो
तुझा स्पर्श मला जाणवेल।
नको तुझी घुसमट ना घरच्यांची
सर्वांनाच मुक्त करतोय मी आता।
सहनशीलतेचा अंत माझ्या
मरणाला कवटाळतो आता।
कवी प्रेम।
०१/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Sunday, March 31, 2019

तुझा हात हातात राहु दे...!

तुझ्या आठवणीच्या वादळात
एक क्षण माझा ही असु दे...!
तुझा प्रेमाचा हात सखे
आयुष्यभर हातात राहु दे..!
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर
जगतोय गं मी आज।
तुचं माझं सर्वस्व ते कवीच्या
कवितेचा जणु आहे तो साज।
कवी प्रेम।
३१/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, March 30, 2019

तिच्या आणि माझ्या मनातलं सारं...!


आज बिलकुल मुड नाही
माझा तो सेल्फी काढायचा।
माझ्या ह्रदयात आवाज येतो
फक्त तुझ्याच त्या रडण्याचा।
भास तो ध्यानी मनी
अभास तुझ्या त्या प्रेमाचा।
मग विचार तरी करतेस
कशाला..?
माझ्या भावना अन् निखळं त्या मनाचा।
तुचं माझं सर्वस्व ते
अन् दोर तो आयुष्याचा।
मगच मला भास होतो
आपल्या दोंघाच्या भविष्याचा।
आजही प्रत्येक क्षणाला तु
मला आठवतेस येवढं मात्र खरं आहे।
नि:शब्द असेल तरी माझं
प्रेम ते तेवढंच खरं आहे।
आजही ह्या भावनांना वाटतं
की तुचं माझं जग आहेस।
आणि हे ही खरं आहे
की तु माझ्या खऱ्या प्रेमाची
ओळखं आहे।
तुझ्याच मुळे माझ्या जिवनाला
आज तो अर्थ आहे।
अन् मग सहज असं वाटुन जात
की तुझ्या प्रेमापुढे संगळ काही व्यर्थ आहे।
कवी प्रेम।
३०/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Friday, March 29, 2019

नका पडु प्रेमात.....!

नका पडु प्रेमात कधी
फुकटं हा सल्ला सांगतो।
सतत हसणारा तो येथे
ढसाढसा एकटाच रडतो।
ना किंमत होते त्याची
ना त्याच्या ती प्रेमाची।
यशस्वी नाही झाला तो तर...
देशोधडीला जाऊन राख रांगोळी
त्याच्या आयुष्याची।
कवी प्रेम।
२९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

तिनं सोडलं मला.....!

तिच्यावर कसलाच अधिकार
नाही नंकळत कळुन चुकले मला...!
खऱ्यां अर्थाने उमजलं ते
तिनं सोडलं कायमच मला।
मी टाकलेला शब्द तिच्यासाठी
कायम एक लकीर असायचा..!
माझ्यासाठी सर्वस्व ती फक्त
अन् तिचा प्रेमाचा भाव असायचा।
कवी प्रेम।
२९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Thursday, March 28, 2019

मरणाला मिठी मारणार...!

ते बोलणं कमी ना स्वतःची
काळजी स्वतःमी घेणार...!
तुझा हात सुटताच सखे
मरणाला मी मिठी मारणार...!
कवी प्रेम।
२८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Wednesday, March 27, 2019

का झिडकारते तु मला....?

तुमच्या-सारखं तासभर
नाही बोलत आम्ही प्रेमात।
स्वतःची घुसमट ती अन्
मरणं दुसऱ्यांच्या सुखात।
मा़झ्या इतके नव्हे कदाचित
त्याहुन दुपट्ट ती प्रेम करते माझ्यावर।
शब्दाने मात्र अबोल ती नेहमी
अन् असं वागते की प्रेमच नाही माझ्यावर...!
दुसऱ्यांचा विचार करने नेहमी
तिचं ती कर्तव्य मानते।
स्वतःचा जीव मारुनी
ती असं का बरं वागते...?
आपण कोणावर प्रेम करतो
या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम
करतं याचा विचार केला पाहिजे।
आपल्यासाठी कोणी तरी थांबलय,
वाट पाहतयं येवढं लक्षात ठेवलं पाहिजे।
दुसऱ्यांचा विचार करणारी तु..
मी ही त्यात मोडतोच ना...?
पाण्याशिवाय तो मासा
एका क्षणात मरतोच ना..?
तुझ्याशिवाय अपुर्ण मी
चांगलच ठाऊक आहे तुला।
तरी पण झिडकारते तु
का? तेच कळत नाही मला।
कवी प्रेम।
२७/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, March 25, 2019

प्रेमाची ती व्यथा


काय सांगु मी ती
प्रेमाची आजची व्यथा।
फक्त वासनेने भरकटले सर्व
बदनाम झाली राधा-कृष्णाची कथा।
लग्नानंतर ही प्रेम होऊ शकतं..?
हा फक्त चावटपणा आहे।
ना कसला स्पर्श कधी तेच
खरं नि:स्वार्थ प्रेम आहे।
सोडा तुम्ही प्रेम करणं
तुमचं ते काम नाही।
पवित्र ते नातं आहे
बाहुला-बाहुलीचा खेळ नाही।
कवी प्रेम।
२५/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Tuesday, March 19, 2019

स्वतःला सिद्ध करतो।

माझ्या मते कवीचा चेहरा नव्हे
तर...शब्द रचनेतला दम पाहिला पाहिजे।
हसत तर मी ही असतो कायम
फक्त विरहाचा भाव समजला पाहिजे।
होय मीच तो प्रेम कवी जो
फक्त तिलाच कवितेत मांडतो।
वर्षा मागुन वर्ष गेली तरी...आज
स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो।
कवी प्रेम।
१९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

पाठीशी ती आहे।

तयारी काय करु अन् कशी..?
विषय अजुन फिक्स नाही।
तीच डोळ्यांसमोर सारखी
दुसरं काहीच दिसतं नाही।
तयारी तर कशी दर्जेदार हवी
त्यात कवीचा दम आहे।
तयारीची गरज नाही मला
कारण माझ्या पाठीशी ती आहे।
कवी प्रेम।
१९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Wednesday, March 13, 2019

तिचा विरह देखील पुरस्कार देतो

तिचं प्रेम तर मला
भरपुर काही देऊन गेलं..!
लायकी नसुन सुद्धा मले
यशाच्या उंच शिखरावर बसवलं।
आज विरह देखिल मजला
पुरस्काराचा मानकरी ठरवतोय।
रुजतं चालली ती मनात
एका भेटीची वाट पाहतोय..।
भेटल्यावर बरंच काही सांगायचंय
मनातलं सारं तिला......!
हक्कदार तुचं बघ साऱ्या
पुरस्काराची जगाला ओरडुन
सांगायचय मला...!
कवी प्रेम।
१३/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, March 11, 2019

जवानाच्या धर्मपत्नीची यशोगाथा


जवान देशासाठी करतो
जीवाची आणिबानी।
देशा इतकीच महत्वाची कहानी
म्हणजे त्याची अर्धांगिनी।
देशासाठी लढतो माझा पती
दिवस रात्र त्यांचा मला अभिमान वाटतो।
कुंकु ते त्याच कपाळी अन्
संसार हा आनंदात थाटतो।
माझा पती जिवावर उदार तो
म्हणुन तर इथे आपण शांततेत राहु शकतो।
हो मला गर्व आहे माझ्या पतीचा
तो देशाच्या कामी येत आहे।
त्यांच्या पत्नीकडे कानाडोळा करतो हा नीच समाज त्यांना काय अक्कल आहे।
भावनेचा डोह फुटतो जेव्हा
माझ्या पतीची आठवण येते।
डोळ्याला ही पाण्याचे ओझे
अन् ते चटकन कोसळु लागते।
एक क्षण ही जात नाही असा की
त्या क्षणात त्यांची आठवण नसेल।
भावना त्या आमच्या फक्त
एक जवानाची पत्नीच समजेल।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
११/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, March 9, 2019

चेहऱ्यावर हसु

चेहऱ्यावर हसु कायम माझ्या
ना कसला आनंद आहे।
दु:खं लपवायंच हेच ते
एकमेव माझ्यासाठी औषध आहे।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Friday, March 8, 2019

महिला दिनाच्या शुभेच्छा

*महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

दुसऱ्यासाठी वाहुन घेते स्वतःला
ती आमची भारतीय नारी।
संसारीक असते ती अन्
संसाराला समजते आपली शिदोरी।
स्री ला कमी लेखु नका तुम्ही..
तलवारीची दार ती असते।
बहिना,अहिल्या,जिजाऊ
वेळोप्रसंगी ती झासी ची राणी अवतरते।
कमी ना कोणत्या श्रेत्रात ती
अशी आजची महिला आहे।
सम्मान द्या पर स्री ला
यातंच आपल पुरुषत्व आहे।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

चाहुल तू येण्याची

आजही नकळत भासते गं
मला चाहुल तु येण्याची....!
समजावतोय मी मनाला माझ्या
नको घुसमट करु तु स्वतःची..!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Thursday, March 7, 2019

सर्वस्व ती

माझ्यासाठी सर्वस्व ती अन्
तिच्यासाठी मात्र घरचे होते।
टाइमपास तिच्या नजरे प्रेम
अन् माझं ते जिवापाड होते।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०७/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, March 4, 2019

वेळ घ्यावा लागेल

नक्की माझं गुण गातील
जे आज मला टाळतात।
माझ्या चांगल्या गोष्टी नाही पण..
वाईट गोष्टीवर बोट ठेवतात।
वेळ घ्यावा लागेल त्यांना
मला एक दिवस भेटण्यासाठी।
गर्व नव्हे तर प्रयत्नशील आहे अन्
साद घालतोय तिला प्रत्येक कवितेसाठी।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०४/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

चांगली नित्तीमत्ता देवाचे दुसरं रुप


देव फक्त मनी अन्
प्रयत्नावर जोर हवा।
देवाच्या नावाखाली ढोंगीपणा
अन् रोजच चेहरा नवा।
दगडातल्या त्या देवाला..
सर्वत्र आज पुजलं जातं।
मनातलं सारं संकट
त्याच्यावर टाकलं जातं।
देव फक्त मनी ठेवा बाकी..
बनगटाच्या जोरावर सोडायचं असतं।
कष्ट न करता थोडचं कधी
पोटाला खायला मिळतं असतं।
कवी प्रेम।
०४/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Tuesday, February 26, 2019

सलाम विर जवानांना


मैत्रीच्या लायक नाही पाक
हल्याच्या लायक आहे फक्त।
दाखवुन दिली जागा तुम्हाला
दाखवुनीया हिंदुस्तानी रक्त..!
ना संत ना सादु आम्ही
विर ते जवान आहोत।
आमच्या नादी लागु नका
आम्ही लय भावनीक आहोत।
पाक आता तरी तु शहाणा हो
आम्ही रक्ताचा बदला रक्तानेच घेतो।
प्रेमाचा तो सागर आम्ही अन्
दुश्मनाचा कायमचा खात्मा करतो।
ना फांदी ना खोड ते
आम्ही मुळा सकट दुश्मनी उखाडतो।
स्वागत या निर्णय पद्धतीचे
अन् सलाम त्या विर जवानांना।
ज्यांनी इज पाकला धडा शिकवला।
सार्थ अभिमान वाटतो तुमचा
अन् सलाम तुमच्या कर्तुत्वाला।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
२६/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, February 8, 2019

प्रपोज केलं

जीला प्रपोज करायचं होतं
तिनं block केलं मला।
जी आवडतं नाही तिनं
पुन्हा प्रपोज केलं मला।
नाही कळंत मला नेमकं
काय म्हणावं या खेळाला।
नशिबातंच खोट ती माझ्या
दोष कसा देऊ त्या दोंघीना।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/