Friday, August 23, 2019

लोण्याची चोरी

लोण्याची जसी चोरी तसी हा
प्रेमाची ही सहज करतं होता।
मनी मनी गोपीकांच्या तो
जसा वारंवार ठसतं होता।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२४/०८/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

पाहता क्षणी तुला

तुला पाहता क्षणी माझं
काय होतं हे मलाच कळतं नाही।
शब्दाचा तो काहोर माजतो मनी
काय लिहावं हे जुळतं नाही।
तुला माझ्या त्या मनातलं
बरंच काही सांगावसं वाटतं..!
भिती ती दुर जाण्याची तु अन्
मनाच घोडं ते मनातच आडतं।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

लाजुन हसणे

लाजुन हसणे अन् ते
तुझे हसून ते पाहणे।
मी ओळखुन ते आहे
तुझ्या प्रेमाचे ते बहाने।
तुला पाहिल्या नंतर बघ
गुलाबाला ही कळी आली।
तुला पाहता क्षणी माझ्या
ह्रदयात नकळंत ती विरुन गेली।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

समजु शकली नाहीस

आरे तुच समजु शकली नाहीस
मला तेवढं तरी बरं होतं।
किती ते तुचं खरं प्रेम
खरं ते माझं होतं।
नादान होता चेहरा तुझा
तो मी ओळखु शकलो नाही।
तुझ्या त्या अशा प्रेमाला
मी कधीच समजु शकलो नाही।
किती सहजरित्या प्रेमाचं ते
नाटक रंगवलं होतंस तु।
माझ्या त्या भावनांना
अगदी अलगद दुखवलं गं तु।
आज माझ्या अशा परिस्थितीला
सारे तुलाच गं दोषी ठरवतात.!
मी नाही कारण खरं प्रेम करणारे
फक्त प्रेमचं करतं राहतात..!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२३/०८/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in