Sunday, March 31, 2019

तुझा हात हातात राहु दे...!

तुझ्या आठवणीच्या वादळात
एक क्षण माझा ही असु दे...!
तुझा प्रेमाचा हात सखे
आयुष्यभर हातात राहु दे..!
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर
जगतोय गं मी आज।
तुचं माझं सर्वस्व ते कवीच्या
कवितेचा जणु आहे तो साज।
कवी प्रेम।
३१/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, March 30, 2019

तिच्या आणि माझ्या मनातलं सारं...!


आज बिलकुल मुड नाही
माझा तो सेल्फी काढायचा।
माझ्या ह्रदयात आवाज येतो
फक्त तुझ्याच त्या रडण्याचा।
भास तो ध्यानी मनी
अभास तुझ्या त्या प्रेमाचा।
मग विचार तरी करतेस
कशाला..?
माझ्या भावना अन् निखळं त्या मनाचा।
तुचं माझं सर्वस्व ते
अन् दोर तो आयुष्याचा।
मगच मला भास होतो
आपल्या दोंघाच्या भविष्याचा।
आजही प्रत्येक क्षणाला तु
मला आठवतेस येवढं मात्र खरं आहे।
नि:शब्द असेल तरी माझं
प्रेम ते तेवढंच खरं आहे।
आजही ह्या भावनांना वाटतं
की तुचं माझं जग आहेस।
आणि हे ही खरं आहे
की तु माझ्या खऱ्या प्रेमाची
ओळखं आहे।
तुझ्याच मुळे माझ्या जिवनाला
आज तो अर्थ आहे।
अन् मग सहज असं वाटुन जात
की तुझ्या प्रेमापुढे संगळ काही व्यर्थ आहे।
कवी प्रेम।
३०/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Friday, March 29, 2019

नका पडु प्रेमात.....!

नका पडु प्रेमात कधी
फुकटं हा सल्ला सांगतो।
सतत हसणारा तो येथे
ढसाढसा एकटाच रडतो।
ना किंमत होते त्याची
ना त्याच्या ती प्रेमाची।
यशस्वी नाही झाला तो तर...
देशोधडीला जाऊन राख रांगोळी
त्याच्या आयुष्याची।
कवी प्रेम।
२९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

तिनं सोडलं मला.....!

तिच्यावर कसलाच अधिकार
नाही नंकळत कळुन चुकले मला...!
खऱ्यां अर्थाने उमजलं ते
तिनं सोडलं कायमच मला।
मी टाकलेला शब्द तिच्यासाठी
कायम एक लकीर असायचा..!
माझ्यासाठी सर्वस्व ती फक्त
अन् तिचा प्रेमाचा भाव असायचा।
कवी प्रेम।
२९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Thursday, March 28, 2019

मरणाला मिठी मारणार...!

ते बोलणं कमी ना स्वतःची
काळजी स्वतःमी घेणार...!
तुझा हात सुटताच सखे
मरणाला मी मिठी मारणार...!
कवी प्रेम।
२८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Wednesday, March 27, 2019

का झिडकारते तु मला....?

तुमच्या-सारखं तासभर
नाही बोलत आम्ही प्रेमात।
स्वतःची घुसमट ती अन्
मरणं दुसऱ्यांच्या सुखात।
मा़झ्या इतके नव्हे कदाचित
त्याहुन दुपट्ट ती प्रेम करते माझ्यावर।
शब्दाने मात्र अबोल ती नेहमी
अन् असं वागते की प्रेमच नाही माझ्यावर...!
दुसऱ्यांचा विचार करने नेहमी
तिचं ती कर्तव्य मानते।
स्वतःचा जीव मारुनी
ती असं का बरं वागते...?
आपण कोणावर प्रेम करतो
या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम
करतं याचा विचार केला पाहिजे।
आपल्यासाठी कोणी तरी थांबलय,
वाट पाहतयं येवढं लक्षात ठेवलं पाहिजे।
दुसऱ्यांचा विचार करणारी तु..
मी ही त्यात मोडतोच ना...?
पाण्याशिवाय तो मासा
एका क्षणात मरतोच ना..?
तुझ्याशिवाय अपुर्ण मी
चांगलच ठाऊक आहे तुला।
तरी पण झिडकारते तु
का? तेच कळत नाही मला।
कवी प्रेम।
२७/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, March 25, 2019

प्रेमाची ती व्यथा


काय सांगु मी ती
प्रेमाची आजची व्यथा।
फक्त वासनेने भरकटले सर्व
बदनाम झाली राधा-कृष्णाची कथा।
लग्नानंतर ही प्रेम होऊ शकतं..?
हा फक्त चावटपणा आहे।
ना कसला स्पर्श कधी तेच
खरं नि:स्वार्थ प्रेम आहे।
सोडा तुम्ही प्रेम करणं
तुमचं ते काम नाही।
पवित्र ते नातं आहे
बाहुला-बाहुलीचा खेळ नाही।
कवी प्रेम।
२५/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in