हतात ठेऊनिया फुलाची पाकळी
डोंळ्यात तुझी ती मुर्त माझ्या।
आठवणीत राहिल कायम मी
अन् प्रत्येक कविता तुझ्या।
सोडतोय शेवटचा श्वास माझा
जो तुझ्यात गुतंला होता।
काळाची मर्जी ती अन्
नशिबाचा माझ्या भोग होता।
कवी प्रेम।
२९/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Saturday, September 29, 2018
शेवटचा श्वास माझा
Friday, September 28, 2018
"अथांग प्रेम"
चाललीस तु सोडुन तर.......
माघ वळुन बघतेस का...?
मी होतो तसा बरा होतो
मला बदललस का...?
प्रेमात घमंडी तु अन्...
मी हताश आज आहे।
तुझ्या नजरेत टायमपास
अन् माझ्यासाठी स्वर्ग आहे।
ते म्हणजे *"अथांग प्रेम"*
कवी प्रेम।
२८/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Thursday, September 27, 2018
काय किंमत त्या प्रेमाची..?
आठवणींना कुरवाळत
त्या पेनावर जोर देतो।
ह्रदयी हुंदका दाटुनीया
भाव कागदावरी उतरतो।
मनाला मारुनी मी करमणुक
करतो या युवा पिढीची।
थिल्लरपणा यांच्या नजरेत
काय किंमत त्या प्रेमाची..?
कवी प्रेम।
२७/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Wednesday, September 26, 2018
सौंदर्याच्या जोरावर
हल्ली बिलकुल भरोसा
बसतं नाही माझा प्रेमावर...!
टायमपास करतात मुली
सौंदर्याच्या त्या जोरावर।
कुठं ठाऊक त्यांना की....
सौंदर्य आज आहे उद्या नाही।
प्रेम करणारा एकदाच भेटतो
आयुष्यात पुन्हा भेटतं नाही।
मी तिच्या सौंदर्यावर नाही तर....
प्रेम तिच्या लाजाळु स्वभाव केलं।
कदाचित तिचं ही प्रेम होतं म्हणुन
तर मला कवी हे नवं नावं मिळालं।
ती विसरली असेल पण....
मी कसा विसरु त्या नकटीला..?
कविता पुर्णच होते तिच्यामुळे
अन् तिची आठवण शब्द देतात मला।
कवी प्रेम।
२६/०९/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/
नापास झालो प्रेमात...!
मी लव गुरु कसला...मित्रांनो
मी तर नापास झालो प्रेमात।
नाही जागा करु शकलो
मी तिच्या त्या मनात।
मला काय कळतंय हो प्रेमाबद्दल
मी तर..यात अडाणी आहे।
शब्दांचा बादशाहा मी राजा
तिच्या प्रेमात भुकेला आहे।
लिहायचं शिकलो फक्त तिच्यामुळं
अन् करमणुक तुम्हा सर्वांची।
प्रत्येक कवितेतं माझं मनोगत
चेहरा समोर तिचा अन् जुळणी मात्र शब्दांची।
कवी प्रेम।
२५/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Saturday, September 22, 2018
कोण कवी म्हणलं मला....!
आज ही सतावतंय मला
आठवणीतलं ते खरं प्रेम।
जगावेगळ होतं ते अन्...नव्हतं
कदापी ते तुमच्यावानी सेम।
ना कधी वासनेनं होतं
ना कसली भुक होती।
नि:स्वार्थी मनाने आगदी मी
तिचा अन् ती माझी फक्त होती।
काळाने घाला घातला आज
अन् वेगळ केलं माझ्यापासुन तिला।
साथ सुटली तिची तर...मित्रांनो
कसं सुंचल अन् कोण कवी म्हणलं मला...!
कवी प्रेम।
२२/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Wednesday, September 19, 2018
तिचं प्रेम ते सवडीनुसार..
माझ्या प्रेमाच्या बदल्यात तिचा
तिरस्कार माझ्या नशिबी आहे।
साधं बोलणं पण महागलं तिचं
इतका मी वाईट आहे...?
कदाचित तिचं ही प्रेम असेल
पण...ते तिच्या सवडीनुसार।
अबोला तिचा जिव घेतो
अन् शब्द होतात पसार।
ती सोबत असली की
शब्दांचा कसा काहोर माजतो।
पेनाचा हुलडपणा नुसता अन्
वहीवर सहज कविता लिहितो।
कवी प्रेम।
१९/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/