ना कवितेचा ना चारोळी
असर होतो तिच्यावर।
ती अशी शांत बसताच
दडपण येतं माझ्यावर।
शांत अशी बसु नकोस
काही तरी बोल गं।
संभाळुन घे या वेड्याला
रुसवा फुगवा सोड गं।
तुझे ते बोल रुपी शब्द मला
भरपुर काही सुचंवून जातात।
अन् या वेड्या प्रेम कवीच्या
कविता बंघ पुर्ण होतात।
✍कवी प्रेम✍
१३/०७/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Friday, July 13, 2018
अशी शांत नकोस बसू।
Thursday, July 12, 2018
असं कुठं असतं का...?
लय हुशार अन् सुंदर
बी लय होती ती।
रंभा उर्वसी मेनका फिक्या
इतकी गोड होती ती।
दिसण्या परीस स्वभाव
जडला माझ्या मनी।
कोणीच नको मले
तिच फक्त माझ्या ध्यानी।
लय बदललं मला अन्
एकट टाकून गेली ती शाहणी।
लय राग आलं मले तिचा
असं कुठं असतं का...?
जो वेडा स्वतःपाय त्याला
असं अर्धवाटंत कोण सोडतं का..?
✍कवी प्रेम✍
१२/०७/०१८
९६०४०००९६९
Tuesday, July 10, 2018
प्रेमाचं सार्थक झालं
तिचा तो बावळंट शब्द
आठवताच चेहऱ्यांवर हसु फूटते।
जगण्याचा तोच एक साहारा
माझा येवढेच मला उमजते।
लय प्रेम केलं तिच्यावर
पण..वाया नाही गेलं।
कवी ही पदवी मिळाली
अन् प्रेमाचं सार्थक झालं।
✍कवी प्रेम✍
१०/०७/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/
Friday, June 29, 2018
शांत झाला कवी।
कविता आज सुचेनाशी झाली
शब्द ते प्रेमाचे विसरुनी गेले।
काहोर मजवायचे मनी कधीकाळी
शब्द आज सारे गुपचुप झाले।
बडबडणारे ते कवी मन
आज कसे शांत झाले...?
प्रेमाच्या या दुनियेत गप्प
झाला आज हा कवी।
तर... कसा अमर राहिल
तो तिचा प्रेम कवी।
✍कवी प्रेम✍
२९/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Sunday, June 24, 2018
मी प्रेम केलं......!
*मी प्रेम केलं......!*
तिच्या त्या गोड स्वभावावर।
तिच्या त्या सुंदर दिसण्यावर
तिच्या लाजणाऱ्या चेहऱ्यावर
*मी प्रेम केलं......!*
रागाने लालबुंद झालेले नाकावर
गुलाबी तिच्या ओठावर
*मी प्रेम केलं.......!*
हुशार नव्हे तर बावळंट
त्या तिच्या शब्दावर
बोलताना हलचाल होणाऱ्या
तिच्या त्या गोड ओठावर
*मी प्रेम केलं........!*
नजरेला नजर नं भिडता
केलेल्या प्रेमळ अशा प्रेमावर
ओठाने कमी पण नजरेने
बोलणाऱ्या तिच्या डोंळ्यावर
*मी प्रेम केलं.........!*
दुसऱ्याच्या सुखासाठी नेहमीच
विरजन आपल्या सुखावर
*मी प्रेम केलं.......!*
तिने दिलेल्या प्रत्येक
सुखदायी क्षणावर
तिने दिलेल्या प्रत्येक
घावरुपी शब्दावर
*मी प्रेम केलं......!*
मला तु विसरून जा या
तिच्या दबक्या आवाजावर
रडताना निघतं असलेल्या
तिच्या त्या हुंदक्यावर
*मी प्रेम केलं......!*
✍ *कवी प्रेम*✍
२४/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Friday, June 22, 2018
तिच्या नजरेत जादु होती
ज्वालामुखीचा उद्रेक जनु
ते तिचे तिक्ष्ण डोळे।
भावलो मी तिच्या नजरेला
मन माझे जरासे भोळे।
एक अनोखी नजराना तिचा
नजरेत तिच्या जादु होती।
मी नव्हे कधीच तिचा
माझ्यासाठी फक्त ती होती।
उर्वसी ना मेनका भारी
माझ्यासाठी तीच रंभा लयभारी।
कवी प्रेम
२२/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
तिला आवडलं तसा बदलतं गेलो।
तिच्या त्या प्रेमाच्या आठवणीत
आज ही रमुन जावंस वाटतं।
तिचं तेवढं खरं बोलणं
बाकी सार खोटं वाटतं।
तिला आवडलं तसा बदलतं
गेलो फक्त मी तिच्यासाठी।
प्रत्येक कविता तिलाच साद
घालते करमणूक या जगासाठी।
प्रत्येक शब्द अतंकरणातुन
निघताना रक्त भंबाळ होतो।
तरी देखील तिच्या आठवणींना
काळजाच्या तिजोरीत ठेवतो।
कवी प्रेम।
२१/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/