Saturday, April 6, 2019

नव वर्ष नवा संकल्प

नव वर्ष नवा संकल्प करु..!
सोडुन तिचा तो फक्त
स्वतःचा विचार करु...!
मतलबी आहे दुनिया येथे
ना आपलं कोणीच हो
पैसा तो सर्वस्व येथे...!
प्रेमाची गुढी नव्हे मी
आज नात्याची गुढी उभारतोय।
स्वार्थी त्या लोंकापासुन मी
कायमचा दुरु जातोय।
कवी प्रेम।
०६/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Tuesday, April 2, 2019

प्रेमावर लिहितं आलो

प्रेम कवी मी फक्त आजवर
प्रेमावरच लिहित आलो।
प्रियेसीच्या त्या प्रेमात
अगदी आंधळा झालो।
आज पहिल्यांदा विरहात
लिहिण्याला धाडस मी करतोय।
तिने दिलेल्या सुखा दुखाची
आज एकटाच जुळवणी करतोय।
कवी प्रेम।
०२/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

थोडं तिचं ही चुकलं होतं...!

फक्त माझंच नाही हो
थोड तिचं ही चुकलं होतं।
एकतर्फी नव्हे ते प्रेम
थोड तिचं ही माझ्यावर होतं।
शिक्षा फक्त मलाच ती
विरहाची आज भेटली।
असुन गुन्हेगार ती सुदा
ती कशी निर्दोष सुटली...?
कवी प्रेम।
०२/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, April 1, 2019

विरहच फक्त

ना शब्द ना कोणता
भाव तो कवितेत येतो।
विरहच फक्त तिचा
जो चेहऱ्यावर ही दिसतो।
कवी प्रेम।
०१/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

वेदनेच्या पाऊलखुणा.....!


चुक केली तुझ्यावर जिवापाड
प्रेम केलं माफ कर मला.....!
नक्कीच आठवुन रडशील तु
एकदिवस प्रेमाची किंमत कळेल तुला।
पण त्या वेळेस कदाचित
मी या जगात नसेल।
स्वतःला दोष देण्यापलीकडे
तुझ्याकडे कोणताच पर्याय नसेल।
थडग्यावर माथा ठेऊनिया
तु तुझ्या प्रेमाची कबुली देशील।
ना कसला आवाज ना तो
तुझा स्पर्श मला जाणवेल।
नको तुझी घुसमट ना घरच्यांची
सर्वांनाच मुक्त करतोय मी आता।
सहनशीलतेचा अंत माझ्या
मरणाला कवटाळतो आता।
कवी प्रेम।
०१/०४/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Sunday, March 31, 2019

तुझा हात हातात राहु दे...!

तुझ्या आठवणीच्या वादळात
एक क्षण माझा ही असु दे...!
तुझा प्रेमाचा हात सखे
आयुष्यभर हातात राहु दे..!
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर
जगतोय गं मी आज।
तुचं माझं सर्वस्व ते कवीच्या
कवितेचा जणु आहे तो साज।
कवी प्रेम।
३१/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, March 30, 2019

तिच्या आणि माझ्या मनातलं सारं...!


आज बिलकुल मुड नाही
माझा तो सेल्फी काढायचा।
माझ्या ह्रदयात आवाज येतो
फक्त तुझ्याच त्या रडण्याचा।
भास तो ध्यानी मनी
अभास तुझ्या त्या प्रेमाचा।
मग विचार तरी करतेस
कशाला..?
माझ्या भावना अन् निखळं त्या मनाचा।
तुचं माझं सर्वस्व ते
अन् दोर तो आयुष्याचा।
मगच मला भास होतो
आपल्या दोंघाच्या भविष्याचा।
आजही प्रत्येक क्षणाला तु
मला आठवतेस येवढं मात्र खरं आहे।
नि:शब्द असेल तरी माझं
प्रेम ते तेवढंच खरं आहे।
आजही ह्या भावनांना वाटतं
की तुचं माझं जग आहेस।
आणि हे ही खरं आहे
की तु माझ्या खऱ्या प्रेमाची
ओळखं आहे।
तुझ्याच मुळे माझ्या जिवनाला
आज तो अर्थ आहे।
अन् मग सहज असं वाटुन जात
की तुझ्या प्रेमापुढे संगळ काही व्यर्थ आहे।
कवी प्रेम।
३०/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in