Tuesday, March 19, 2019

स्वतःला सिद्ध करतो।

माझ्या मते कवीचा चेहरा नव्हे
तर...शब्द रचनेतला दम पाहिला पाहिजे।
हसत तर मी ही असतो कायम
फक्त विरहाचा भाव समजला पाहिजे।
होय मीच तो प्रेम कवी जो
फक्त तिलाच कवितेत मांडतो।
वर्षा मागुन वर्ष गेली तरी...आज
स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो।
कवी प्रेम।
१९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

पाठीशी ती आहे।

तयारी काय करु अन् कशी..?
विषय अजुन फिक्स नाही।
तीच डोळ्यांसमोर सारखी
दुसरं काहीच दिसतं नाही।
तयारी तर कशी दर्जेदार हवी
त्यात कवीचा दम आहे।
तयारीची गरज नाही मला
कारण माझ्या पाठीशी ती आहे।
कवी प्रेम।
१९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Wednesday, March 13, 2019

तिचा विरह देखील पुरस्कार देतो

तिचं प्रेम तर मला
भरपुर काही देऊन गेलं..!
लायकी नसुन सुद्धा मले
यशाच्या उंच शिखरावर बसवलं।
आज विरह देखिल मजला
पुरस्काराचा मानकरी ठरवतोय।
रुजतं चालली ती मनात
एका भेटीची वाट पाहतोय..।
भेटल्यावर बरंच काही सांगायचंय
मनातलं सारं तिला......!
हक्कदार तुचं बघ साऱ्या
पुरस्काराची जगाला ओरडुन
सांगायचय मला...!
कवी प्रेम।
१३/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, March 11, 2019

जवानाच्या धर्मपत्नीची यशोगाथा


जवान देशासाठी करतो
जीवाची आणिबानी।
देशा इतकीच महत्वाची कहानी
म्हणजे त्याची अर्धांगिनी।
देशासाठी लढतो माझा पती
दिवस रात्र त्यांचा मला अभिमान वाटतो।
कुंकु ते त्याच कपाळी अन्
संसार हा आनंदात थाटतो।
माझा पती जिवावर उदार तो
म्हणुन तर इथे आपण शांततेत राहु शकतो।
हो मला गर्व आहे माझ्या पतीचा
तो देशाच्या कामी येत आहे।
त्यांच्या पत्नीकडे कानाडोळा करतो हा नीच समाज त्यांना काय अक्कल आहे।
भावनेचा डोह फुटतो जेव्हा
माझ्या पतीची आठवण येते।
डोळ्याला ही पाण्याचे ओझे
अन् ते चटकन कोसळु लागते।
एक क्षण ही जात नाही असा की
त्या क्षणात त्यांची आठवण नसेल।
भावना त्या आमच्या फक्त
एक जवानाची पत्नीच समजेल।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
११/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, March 9, 2019

चेहऱ्यावर हसु

चेहऱ्यावर हसु कायम माझ्या
ना कसला आनंद आहे।
दु:खं लपवायंच हेच ते
एकमेव माझ्यासाठी औषध आहे।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Friday, March 8, 2019

महिला दिनाच्या शुभेच्छा

*महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

दुसऱ्यासाठी वाहुन घेते स्वतःला
ती आमची भारतीय नारी।
संसारीक असते ती अन्
संसाराला समजते आपली शिदोरी।
स्री ला कमी लेखु नका तुम्ही..
तलवारीची दार ती असते।
बहिना,अहिल्या,जिजाऊ
वेळोप्रसंगी ती झासी ची राणी अवतरते।
कमी ना कोणत्या श्रेत्रात ती
अशी आजची महिला आहे।
सम्मान द्या पर स्री ला
यातंच आपल पुरुषत्व आहे।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

चाहुल तू येण्याची

आजही नकळत भासते गं
मला चाहुल तु येण्याची....!
समजावतोय मी मनाला माझ्या
नको घुसमट करु तु स्वतःची..!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in