Monday, March 11, 2019

जवानाच्या धर्मपत्नीची यशोगाथा


जवान देशासाठी करतो
जीवाची आणिबानी।
देशा इतकीच महत्वाची कहानी
म्हणजे त्याची अर्धांगिनी।
देशासाठी लढतो माझा पती
दिवस रात्र त्यांचा मला अभिमान वाटतो।
कुंकु ते त्याच कपाळी अन्
संसार हा आनंदात थाटतो।
माझा पती जिवावर उदार तो
म्हणुन तर इथे आपण शांततेत राहु शकतो।
हो मला गर्व आहे माझ्या पतीचा
तो देशाच्या कामी येत आहे।
त्यांच्या पत्नीकडे कानाडोळा करतो हा नीच समाज त्यांना काय अक्कल आहे।
भावनेचा डोह फुटतो जेव्हा
माझ्या पतीची आठवण येते।
डोळ्याला ही पाण्याचे ओझे
अन् ते चटकन कोसळु लागते।
एक क्षण ही जात नाही असा की
त्या क्षणात त्यांची आठवण नसेल।
भावना त्या आमच्या फक्त
एक जवानाची पत्नीच समजेल।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
११/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Saturday, March 9, 2019

चेहऱ्यावर हसु

चेहऱ्यावर हसु कायम माझ्या
ना कसला आनंद आहे।
दु:खं लपवायंच हेच ते
एकमेव माझ्यासाठी औषध आहे।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०९/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Friday, March 8, 2019

महिला दिनाच्या शुभेच्छा

*महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

दुसऱ्यासाठी वाहुन घेते स्वतःला
ती आमची भारतीय नारी।
संसारीक असते ती अन्
संसाराला समजते आपली शिदोरी।
स्री ला कमी लेखु नका तुम्ही..
तलवारीची दार ती असते।
बहिना,अहिल्या,जिजाऊ
वेळोप्रसंगी ती झासी ची राणी अवतरते।
कमी ना कोणत्या श्रेत्रात ती
अशी आजची महिला आहे।
सम्मान द्या पर स्री ला
यातंच आपल पुरुषत्व आहे।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

चाहुल तू येण्याची

आजही नकळत भासते गं
मला चाहुल तु येण्याची....!
समजावतोय मी मनाला माझ्या
नको घुसमट करु तु स्वतःची..!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०८/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Thursday, March 7, 2019

सर्वस्व ती

माझ्यासाठी सर्वस्व ती अन्
तिच्यासाठी मात्र घरचे होते।
टाइमपास तिच्या नजरे प्रेम
अन् माझं ते जिवापाड होते।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०७/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Monday, March 4, 2019

वेळ घ्यावा लागेल

नक्की माझं गुण गातील
जे आज मला टाळतात।
माझ्या चांगल्या गोष्टी नाही पण..
वाईट गोष्टीवर बोट ठेवतात।
वेळ घ्यावा लागेल त्यांना
मला एक दिवस भेटण्यासाठी।
गर्व नव्हे तर प्रयत्नशील आहे अन्
साद घालतोय तिला प्रत्येक कवितेसाठी।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०४/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

चांगली नित्तीमत्ता देवाचे दुसरं रुप


देव फक्त मनी अन्
प्रयत्नावर जोर हवा।
देवाच्या नावाखाली ढोंगीपणा
अन् रोजच चेहरा नवा।
दगडातल्या त्या देवाला..
सर्वत्र आज पुजलं जातं।
मनातलं सारं संकट
त्याच्यावर टाकलं जातं।
देव फक्त मनी ठेवा बाकी..
बनगटाच्या जोरावर सोडायचं असतं।
कष्ट न करता थोडचं कधी
पोटाला खायला मिळतं असतं।
कवी प्रेम।
०४/०३/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in