Tuesday, February 5, 2019

तिरस्कार मनी प्रेमाचा

प्रेमाचा तिरस्कार मनी आज
जसा विटाळ आला त्याचा।
हल्ली फक्त भावनेशी खेळतात
विचार नाही करत दुसऱ्यांच्या मनाचा।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

तसंच मी वागणारं......!

का कुणास ठाऊक पण..मी
चुकलोय असं माझ मन मनाला सांगतय।
जिवनाच्या या निर्दयी माणसात
माझं ते ह्रदय एकटंच कसं रडतंय।
तिरस्कार वाटतोय आता मला
माणसांचा जे कधी काळी आपले होते।
आता आपले म्हणायला ही
मनं कसं ते घाबरुन उठते..?
नको कुणाचीच सोबत आता
जिवनभर एकटाच राहणार मी।
माझ्यासोबत जे जसे वागलेत
तसा त्यांच्यासोबत वागंणार मी।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

फसवी प्रियेसी माझी...!

लय नाज तिच्यावर अन्
तिच्या प्रेमाचा मला माज होता।
ती फक्त माझ्याचसाठी
मनाचा तो गोड गैरसमज होता।
धोका देणार ती ही
एक मुलगीच होती...!
तोंडावर एक भाव अन् मनी
अशी ती फसवी माझी प्रियेसी होती।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०५/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, February 4, 2019

लय भरोसा तिच्यावर

गर्वच नव्हे तर...लय नाज होता
मला त्या तिच्यावरच्या  प्रेमावर।
आयुष्य माझं फक्त तिचं प्रेम
स्वतःपेक्षा जास्त भरोसा होता तिच्यावर।
देशो धडीला गेलं मित्रांनो
ते माझं पहिलं प्रेम।
नशिंबाची ही अनोखी खेळी
माझ्यासोबत नविन गेम।
कवी प्रेम।
३१/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

वाचता येतं नव्हतं त्या सटवीला

कसं अन् का साकट घालु
मी त्या देवाऱ्यातल्या देवाला।
स्वतःला सिद्ध करण्याची वेळ ती
का..?मीच समजुन घ्याच प्रत्येकाला।
नशिबंच माझं लिहिता येत होतं
म्हणे वाचता येत नव्हतं त्या सटवीला।

✍✍कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२३/०१/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

नावा निराळी ती.....!

तिचं प्रेम फक्त ते
तोंडापुरता देखावा होता।
माझ्या भावनेचा तिच्यासाठी
तो एक मजेदार खेळ होता।
हुशार ती अन् नावानिराळी
वेड्यात फक्त मी निघालो।
ना घरचा ना घाट का
मी तो आज एकटा पडलो।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०४/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, February 3, 2019

विंनती मुलींना।

या प्रेमात टाईमपास करणाऱ्या
मुलींना हात जोडुन विंनती करतो।
तुमच्या साठी हा मजेदार खेळ
अन् मुलगा मात्र पुरता वेडा होतो।
नसेल प्रेम मनी तुमच्या तर...
उगाच एखाद्याच आयुष्य बरबाद करु नका।
प्रेम या पवित्र नात्याला असा
उगाच काळीबां फासू नका..!
तुमच्या तोंडी हे पवित्र नावं
प्रेमाच ते बिलकुल शोभतं नाही।
साऱ्या मुली त्या सारख्याच हो
त्यांना प्रेम कधीच कळंत नाही।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
०३/०२/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/