Tuesday, October 2, 2018

संशयाची पाल चुक-चुकते


आपल्या प्रेमावर अविश्वास
दाखवणे कितपत योग्य ठरते..?
जिवापाड प्रेम ज्या व्यक्तीवर
त्याच्यावरच संशयाचे बोट जाते।
आपल्याच मनात खोट तेथे
संशयाची पाल चुक-चुकते।
कवी प्रेम।
०२/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, October 1, 2018

लय जड जाईल माझं प्रेम विसरायला।


माझं प्रेम विसरायला
लय जड जाईल तिला।
आठवणीत कायम राहिल
झोपेतुन उडवेल तिला।
मग प्रयत्न करुन बंघ
विरता येतंय का मला...?
शोधतं फिरेल ती प्रेमवेडी
मोठ्याने हाक मारतं मला।
तेव्हा प्रेम अन् प्रेमाचा विषय
माझ्यासाठी संपला असेल।
माझ्याइंतके तिच्यावर प्रेम
करणारं या जगी कुणीचं नसेल।
मी ही विसरेल तिला सरणावरती
ठेवुन जेव्हा जाळतीला मला।
तिचे ही डोंळे पानावतील एवढं
प्रेम देऊन जाईल मी तिला।
कवी प्रेम।
०१/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, September 29, 2018

शेवटचा श्वास माझा


हतात ठेऊनिया फुलाची पाकळी
डोंळ्यात तुझी ती मुर्त माझ्या।
आठवणीत राहिल कायम मी
अन् प्रत्येक कविता तुझ्या।
सोडतोय शेवटचा श्वास माझा
जो तुझ्यात गुतंला होता।
काळाची मर्जी ती अन्
नशिबाचा माझ्या भोग होता।
कवी प्रेम।
२९/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, September 28, 2018

"अथांग प्रेम"


चाललीस तु सोडुन तर.......
माघ वळुन बघतेस का...?
मी होतो तसा बरा होतो
मला बदललस का...?
प्रेमात घमंडी तु अन्...
मी हताश आज आहे।
तुझ्या नजरेत टायमपास
अन् माझ्यासाठी स्वर्ग आहे।
ते म्हणजे *"अथांग प्रेम"*
कवी प्रेम।
२८/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, September 27, 2018

काय किंमत त्या प्रेमाची..?


आठवणींना कुरवाळत
त्या पेनावर जोर देतो।
ह्रदयी हुंदका दाटुनीया
भाव कागदावरी उतरतो।
मनाला मारुनी मी करमणुक
करतो या युवा पिढीची।
थिल्लरपणा यांच्या नजरेत
काय किंमत त्या प्रेमाची..?
कवी प्रेम।
२७/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, September 26, 2018

सौंदर्याच्या जोरावर


हल्ली बिलकुल भरोसा
बसतं नाही माझा प्रेमावर...!
टायमपास करतात मुली
सौंदर्याच्या त्या जोरावर।
कुठं ठाऊक त्यांना की....
सौंदर्य आज आहे उद्या नाही।
प्रेम करणारा एकदाच भेटतो
आयुष्यात पुन्हा भेटतं नाही।
मी तिच्या सौंदर्यावर नाही तर....
प्रेम तिच्या लाजाळु स्वभाव केलं।
कदाचित तिचं ही प्रेम होतं म्हणुन
तर मला कवी हे नवं नावं मिळालं।
ती विसरली असेल पण....
मी कसा विसरु त्या नकटीला..?
कविता पुर्णच होते तिच्यामुळे
अन् तिची आठवण शब्द देतात मला।
कवी प्रेम।
२६/०९/०१८
९६०४०००९६९
९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/

नापास झालो प्रेमात...!


मी लव गुरु कसला...मित्रांनो
मी तर नापास झालो प्रेमात।
नाही जागा करु शकलो 
मी तिच्या त्या मनात।
मला काय कळतंय हो प्रेमाबद्दल
मी तर..यात अडाणी आहे।
शब्दांचा बादशाहा मी राजा
तिच्या प्रेमात भुकेला आहे।
लिहायचं शिकलो फक्त तिच्यामुळं
अन् करमणुक तुम्हा सर्वांची।
प्रत्येक कवितेतं माझं मनोगत
चेहरा समोर तिचा अन् जुळणी मात्र शब्दांची।
कवी प्रेम।
२५/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/