ज्वालामुखीचा उद्रेक जनु
ते तिचे तिक्ष्ण डोळे।
भावलो मी तिच्या नजरेला
मन माझे जरासे भोळे।
एक अनोखी नजराना तिचा
नजरेत तिच्या जादु होती।
मी नव्हे कधीच तिचा
माझ्यासाठी फक्त ती होती।
उर्वसी ना मेनका भारी
माझ्यासाठी तीच रंभा लयभारी।
कवी प्रेम
२२/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Friday, June 22, 2018
तिच्या नजरेत जादु होती
तिला आवडलं तसा बदलतं गेलो।
तिच्या त्या प्रेमाच्या आठवणीत
आज ही रमुन जावंस वाटतं।
तिचं तेवढं खरं बोलणं
बाकी सार खोटं वाटतं।
तिला आवडलं तसा बदलतं
गेलो फक्त मी तिच्यासाठी।
प्रत्येक कविता तिलाच साद
घालते करमणूक या जगासाठी।
प्रत्येक शब्द अतंकरणातुन
निघताना रक्त भंबाळ होतो।
तरी देखील तिच्या आठवणींना
काळजाच्या तिजोरीत ठेवतो।
कवी प्रेम।
२१/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Wednesday, June 20, 2018
लेखणीचं सौभाग्य
प्रियेसी मानलं मी लेखणीला
जपतोय तिचं ते सौभाग्य।
आठवतं मला तिच्या प्रेमामुळं
हे मी संमजतो माझं भाग्य।
✍ *कवी प्रेम*✍
२०/०८/०१८
९६०४०००९६९
एकच इच्छा मनी
एकच इच्छा मनी या
प्रेम वेड्या कवीची।
पैसा-अडका लय येईल
प्रेम अन् भुक तुमच्या मैत्रीची।
माझ्यासाठी सर्वस्व प्रेम अन्
जिव की प्राण आहे तुमची मैत्री।
चला झोपा आता नको
कसला विचार शुभ रात्री।
कवी प्रेम।
१९/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Wednesday, June 6, 2018
नि:स्वार्थी प्रेम तीचं
पहिल्या पाऊसाची सरीत तो
भिजुन गेला थंडगार वारा।
प्रेमच तिचं नि:स्वार्थी होतं
सांगुन गेला तो पाऊस सारा।
अशाच पाऊसात आम्ही दोंघे
एका छत्री खाली असायचो।
ओलेचिंब भिजुन दोंघे ही
एकामेंकाकडे एकटक बंघायचो।
आता फक्त आठवणीत राहिलेत
ते गेलेले आमच्या प्रेमाचे दिवस।
ती गेली अर्ध्यावर सोडुन
अपुर्ण राहिली माझ्या प्रेमाची ती हवसं।
असचं सुखी ठेवं तिला
देवाजवळ येवढाचं माझे नवस।
कवी प्रेम।
०६/०६/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Wednesday, May 9, 2018
ही दोस्ती तुटायची नाय
बरंच काही घडून गेलं
मित्रांनो आज दिवसभरात।
भेटुन साऱ्या मित्र-मैत्रीणींना
मन थोडावेळ गेल भुतकाळात।
तोच हाव तोच भाव आजही
सर्वांच्या चेहऱ्यावर होता।
ही दोस्ती तुटायची नाय
सर्वांचा एक नारा होता।
पारणे फिटले डोळ्यांचे
सर्वांना आनंदीत पाहुन।
सर्व जन गेले जिकडे-तिकडे
मन आले गहीवरून
कवी प्रेम
०९/०५/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
Sunday, May 6, 2018
तिला पाहण्याची ओढ
मनाची घालमेल होतं आहे
जे सुचतं होतं ते सुचतं नाही।
तिला पाहण्याची ओढ मनी
दुसरं काहीच दिसतं नाही।
कवी प्रेम।
०६/०५/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/