Saturday, October 21, 2017

लाल डब्बा संपावर जातो

लाल डब्याशिवाय मला कोणी
कधी प्रेमानं बोललं का?

आमच्या कर्मचाऱ्याविषयी कधी
तुम्हाला हेवा वाटला का?

ड्रायवर माझा रात्रदिवस डोळ्यात तेल घालुन तुम्हाला सुखरूप घरी सोडतो।

तो जिव धोक्कयात घालुन जगतो।
त्याला त्याचा किती दाम भेटतो?

त्या मिळणाऱ्या दोन पैश्यात
संसाराचा गाडा कसा चालवतो।

जनतेला वेढीस नाही धरलं
आम्ही सरकारला धरतो।

आज कळलं असेल या सरकारला
काय होतं जेव्हा लाल डब्बा संपावर जातो।

कवी प्रेम।
२०/१०/०१७
९६०४०००९६९

Thursday, October 19, 2017

लक्ष्मीपुजनाच्या शुभेच्छा

आज कोण खऱ्या अर्थाने
येथे लक्ष्मीला पुजतोय।
कसल काय आल राव
तो फक्त परंपरेला जपतोय।
येरवी तर लक्ष्मी कमवण्यासाठी
स्वतःची नितीमता मात्र विसरतो।
माणसाच काय हो तो
फक्त जशाच तसं वागतो।
फक्त साफ मन ठेवा
लक्ष्मीलाच वाटेल तुमचा हेवा।
(माझ्या सर्व लडक्या मित्र
मैत्रीणीनां लक्ष्मीपुजनाच्या
खुप साऱ्या शुभेच्छा)
कवी प्रेम।
१९/१०/०१७
९६०४०००९६९

Wednesday, October 18, 2017

दिपावलीच्या शुभेच्छा

आजपासून प्रत्येकाच्या
घरात होणार गोड धोड फराळ//१//

फराळाच्या नादात निघणार
हो संगळ्याच दिवाळ//२//

चिमुकल्याच्या सुखासाठी साजरी
करतो आम्ही ही दिवाळी//३//

जपून ठेवलेली पैई पैई
काढतो ठेवलेली कधीकाळी//४//

सर्वत्र दिवा झळकतोय येथे
घेऊन आला एक चकाकी वेगळी//५//

भर तानातानीतच येतो हा सन
किती छान नाव त्याच दिवाळी//६//

प्रत्येक सन रितीप्रमाणे आपण
हो साजरा केला पाहिजे//७//

विनाकारण खर्च मात्र या
दिवाळीत आपण टाळला पाहिजे।
//८//

आपल्याकडुन निसर्गाची हानी
होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे//९//

म्हणजेच फटाके नको रे
विना प्रदूषण करता दिवाळी साजरी केली पाहिजे//१०//

बघा जमतय का मनात जे आल
ते सांगितल हिच माझी ईच्छा//११//

दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडुन
आणि माझ्या परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा//१२//

कवी प्रेम।
१८/१०/०१७
९६०४०००९६९

Sunday, October 15, 2017

केलं परखं

काही तरी मनात माझ्या
टोचतय हो सारखं।
ज्याने जिव लावला जादा
त्यानेच आज का केलं परखं?
कवी प्रेम।
१५/१०/०१७
९६०४०००९६९

Saturday, October 14, 2017

सुंचतात शब्द मला

प्रेमात आहे म्हणुन तर
सुचतात हो शब्द मला।
अन् वाचायला भेटतात
या चारोळ्या तुम्हाला।
कवी प्रेम।
१५/१०/०१७
९६०४०००९६९

Friday, October 13, 2017

पहिलं प्रेम

बरंच काही शिकुन जात
माणसाला त्याच पहिलं प्रेम।
कधी कोनासोबत होईल
त्याचा काहीच नसतो नेम।
कवी प्रेम।
१३/१०/०१७
९६०४०००९६९

Wednesday, October 11, 2017

तुम्हे गया भुल

आज भी संभालकर रखा है
मैने ओ गुलाब का फुल।
जो मुझे कहता है हमेशा याद
मत कर उसे जो तुम्हे गया भुल।
कवी प्रेम।
१२/१०/०१७
९६०४०००९६९