Saturday, June 10, 2017

पहिला पाऊस।

पहिला पाऊस तिला ही
सोबत घेऊन आला आज।

विजाच्या कड कड्यापेक्षा तिचा पारा
अनावर अन् मोठा होता आवाज।

पहिला पाऊस पाऊसात भिजतं
होतो मी अन् छत्रीत उभा ती।

आजारी पडसील छत्रीत ये
असं सारखं म्हणतं होती ती।

पहिल्या पाऊसाने आमच्या प्रेमात
एक वेगळाचं आनंद भरला होता।

माझ्यावरचा तो तिचा राग
आज नाहीसा झाला होता।

प्रेम।
10/06/017
9604000969

Friday, June 9, 2017

मातीत जा असं म्हणाली।

बोलता बोलता आज एका
कारणावरुन मी तिच्यावर चिडलो।

का ती मला संमजुन घेतं
नसेल ?यावरून भांडलो।

तिला नाही आवडलं रागवणं
माझं ती लगेच रडली।

संमजुत काढायला लागलो
तर लगेच ती माझ्यावर चिडली।

हात नको लावुस माझ्या
अंगाला हो चालता असं म्हणाली।

बोलण्याची पण एक हद्द असते राव
चक्क मला मातीत जा असं म्हणाली।

प्रेम।
09/06/017
9604000969

Thursday, June 8, 2017

फक्त स्वप्नात माझी होती।

आज अगदी संहज डोकावुन
पहिलं मी माझ्या मनात।

कुणास ठाऊक पण तिची
वाट पाहतं होतं डोळ्यात।

तिच्या तर मनात आदर नाही कसला
तिच्यासाठी पाणी येतं माझ्या डोळ्यात?

कसं संमजावु या वेड्या
मनाला ती एक स्वप्न परी होती।

जागेपणी नव्हे तर ती
फक्त स्वप्नातचं तुझी होती।

प्रेम।
08/06/017
9604000969

Wednesday, June 7, 2017

आपलेपण वाटेल तुला

असं आवं-जावं बोलु नकोस
गं अवघडल्या सारखं वाटतं।

तुझ्या अशा बोलण्यानं आपलं
नातं जरा लाबंच वाटतं।

मला तु आरे तुरेच
बोल बरं वाटनं मला।

अन् बोलताना आपलेपण
जाणवेल बंघ नक्कीच तुला।

प्रेम।
07/06/017
9604000969

Monday, June 5, 2017

तु नक्की रडशील

प्रत्येक कवितेत मी तुलाच
पाहीन अन् तु मला पाहशील।

किती ही राग राग करं माझा
पण चोरून कविता वाचशील।

तुझ्या विरहात दुखी मी आहे
कवितेचे शब्द रक्तभंबाळ तुला करतील।

छाती ठोकपणे सांगतो सजने
कविता वाचून तु नक्की रडशील।

तुझ्यासोबत घालवलेले माझे थोडे
क्षण तू नक्कीच आठवशील।

परत येशील तु विश्वास आहे
चुकले मी असं रडतं म्हणशील।

स्वतः चे भान हरपुन मला
जोरात मिठी मारशील।

प्रेम।
05/06/017
9604000969

Sunday, June 4, 2017

ब्रेक अप झाला

बोलता बोलता आमच्या दोंघात
भूतकाळातल्या गोस्टीवरुन वाद झाला।

सारं खरं सांगितलं मि तिला तरी
देखील तिनं माझ्यावर स्वंशय घेतला।

किती घट्ट होतं प्रेमाच नातं आमचं
तरी पण आमच्यात ब्रेक अप झाला।

प्रेम।
04/06/017
9604000969

Saturday, June 3, 2017

नशिबं

का कुणास ठाऊक माझं
नशिबं केंव्हा जोर धरेल?

मी जिच्यावर प्रेम करतो
ती माझ्यावर कधी करेल?

ती खुप हुशार आहे पण तिला
माझ्या मनातलं कधी संमजेल?

नक्कीच तो दिवस येईल लवकर
ज्या दिवशी ती माझ्यावर प्रेम करेल।

आज मी रडतो तिच्यासाठी
उद्या ती माझ्यासाठी रडेल।

पण वाईट याचं वाटतं
त्यावेळेस मी या जगात नसेल।

थडग्यावर माझ्या येऊन चुकले
मी असं म्हणतं ती खुप रडेल।

प्रेम।
03/06/017
9604000969