Sunday, May 7, 2017

नेहमी दोषी ठरवायची।

कारण नसताना ही मीच
तिची सारखी माफी मागायची?
एक ही शब्द न बोलता
मात्र ती गप्प बसायची।
तिच्याकडुन काही घडलं
नाही असं ती वागायची।
मला मात्र कोणत्या ना
कोणत्या कारणाने नेहमी
दोषी ठरवायची।
प्रेम।
07/05/017
9604000969

नेहमी दोषी ठरवायची।

कारण नसताना ही मीच
तिची सारखी माफी मागायची?
एक ही शब्द न बोलता
मात्र ती गप्प बसायची।
तिच्याकडुन काही घडलं
नाही असं ती वागायची।
मला मात्र कोणत्या ना
कोणत्या कारणाने नेहमी
दोषी ठरवायची।
प्रेम।
07/05/017
9604000969

Saturday, May 6, 2017

अंधश्रदा।

आज ही माणुस आपल्या
सुखासाठी अंधश्रदेला बळी पडतोय।
त्याचां परिवार सुखात पाहण्यासाठी
तो काहीही करु शकतोय।
नवसाला पावण्यासाठी चक्क देवाला
मुक्या प्राण्याचा बळी दिला जातो।
आरे का मारतात प्राण्यानां त्यांचा
जिव घेऊन कोन सुखी होतो?
प्रेम।
06/05/017
9604000969

Thursday, May 4, 2017

नजरेआड जावो तिचं रडणं।

किती गोड तिच बोलणं
किती गोड तिचं हसणं।
मनाला साथ घालतं रुसणं
नजरेआड जावो तिचं रडणं।
प्रेम।
04/05/017
9604000969

मला नेहाळतं होती।

नेमकं ति कोणाला नेहाळतं
होती त्या लग्न मंडपात।
किती गोड अगदी परीच जनु
का तिच असेल माझ्या नशिबात।
का कुणास ठाऊक पण येता
जाता ती मला नेहाळतं होती।
काहीच माहित नाही तिच्याबद्दल
ती आमच्या नात्यातली होती?
पण काही ही असो राव
ती खरचं खुप गोड हसतं होती।
प्रेम।
01/05/017
9604000969

Tuesday, May 2, 2017

कायम दुरावतात।

प्रेमात भांडण झाल्याने प्रेम
अजुन वाढतं असं म्हणतात।
पण मग प्रेमात शेवटी
एकमेंकाचा तिरस्कार का करतात?
ईतकेही भांडण होऊ देऊ नये
कधी ज्यानेकरुन घर उजाडतात।
आणि मनापासून प्रेम करणारे
आपल्या पासून कायम दुरावतात।
प्रेम।
02/05/017
9604000969

का कुणास ठाऊक?

💞का कुणास ठाऊक पण
आज जरा मन उदास झालंय।
लेखणी आज बिलकुल चलेना
नेमकं मला काय झालयं।
नाही माहित काय कारण
कोणी त्यासाठी काय केलंय।
का असं तर नसेल ना?
मला कुणावर प्रेम झालयं!
असंच होतं ना प्रेमात पडल्यावर
तुम्ही कोणावर कधी प्रेम केलयं?
प्रेम।
01/05/017
9604000969